DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – अकिल शहा
‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत धुळे येथे जिल्हास्तरीय कार्यक्रम सोमवार, 10 जुलै, 2023 रोजी दुपारी 2.30 वाजता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एसआरपीएफ मैदान, धुळे येथे होणार आहे. याठिकाणी उपस्थित नागरीक व लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी शासनाच्या 19 विविध विभागांचे माहितीपूर्ण 34 स्टॉल लावण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे.
लाभार्थ्यांना कार्यक्रमस्थळी येण्यासाठी जिल्हाभरातून 271 बसेसची व्यवस्था
धुळे येथील एसआरपीएफ मैदानावर होणाऱ्या शासन आपल्या दारी जिल्हास्तरीय कार्यक्रमास येणाऱ्या लाभार्थ्यांना कार्यक्रमास उपस्थित राहता यावे, याकरीता जिल्हा प्रशासनातर्फे गाव व तालुका पातळीवरुन वाहतुक व्यवस्था करण्यात आली आहे. लाभार्थ्यांची ने-आण करण्यासाठी एसटी महामंडळाच्या 271 बसेस उपलब्ध करुन दिल्या आहे. त्यात साक्री तालुक्यासाठी 64, शिरपूर 66, धुळे ग्रामीण 68, शिंदखेडा 44 तसेच धुळे मनपा 29 अशी एकूण 271 ची बसेसची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तरी धुळे येथील आयोजित मुख्य कार्यक्रमास जिल्ह्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही शर्मा यांनी केले आहे.
साक्री चे तहसीलदार सोनवणे साहेब यांच्या आदेशानुसार साक्री आगारातून आज सकाळी आठ वाजता एकूण 64 बसेस सोडण्यात आल्या आहेत.