DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- नंदु मेश्राम
चंद्रपूर : वडीलाने दुचाकी वाहन दिले नाही म्हणून 17 वर्षीय मुलाने गळफास लावत आत्महत्या केली. सदर घटना चंद्रपूर शहरातील माता नगर येथील भिवापूर वार्डात घडली. मृतक मुलाचे नाव 17 वर्षीय प्रियांशु निर्दोष जयकर असे आहे.
9 जुलै ला प्रियांशु ने वडिलांना दुचाकी वाहन मागितले होते, वडिलांनी त्याला नकार देत कशाला वाहन हवे, रिकामा फिरत जाऊ नको असे म्हणत त्याला दुचाकी दिली नाही.प्रियांशु त्यादिवशी पायदळ बाहेर गेला. पण गाडी दिली नाही म्हणून त्याने हातावर ब्लेडने वार केले. त्यामुळे मुलाच्या जीवाच्या भितीने पित्याने दुस-या दिवशी आज 10 जुलै ला मुलाला दुचाकी दिली, मात्र त्याच्या मनात राग होता आणि तो राग त्याने संपूर्ण मनावर घेत मोठे पाऊल उचलले.