DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- उमेश महाजन
एरंडोल: तालुक्यातील मुगपाट येथून ९ जुलै २०२३रोजी रात्री सुनिल मगन पावरा या संशयित आरोपीने १३वर्षीय मुलीला काहीतरी आमिष दाखवून पळवून नेले. मुलीचे आईवडील व इतर कुटुंबीय सायंकाळी जेवण करून झोपले असता मुलीला पळवून नेण्यात आले.
याबाबत मुलीच्या वडिलांनी एरंडोल पोलिस स्टेशन ला तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश अहिरे, हेड कॉन्स्टेबल राजेश पाटील, जुबेर खाटीक आदिंकडे देण्यात आला आहे.