नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

नंदुरबारात १९ लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त; शहर पोलीसांची धडक कारवाई

DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी – रविंद्र गवळे
नंदुरबार:- नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने जगताप वाडी परिसरात एका वाहनातून वाहतूक होत असलेल्या १८ लाख ७० रुपये किमतीच्या दारूसह एकुण ४५ लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत वाहन चालकासह मालक व सहचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहचालक फरार झाला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, दि.१२ जुलै २०२३ रोजी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना एक पिकअप व एक इनोव्हा या वाहनांमधुन नंदुरबार शहरातील जगतापवाडी परिसरात अवैध दारू घेवून येणार आहे अशी गुप्त बातमी मिळाली.त्यानुसार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना कारवाईचे आदेश दिले. श्री.कळमकर यांनी दोन वेगवेगळ्या पथकासह जगतापवाडी परिसरात रोडवर सापळा रचला. रस्त्याने येणार्‍या जाणार्‍या वाहनांची बारकाईने तपासणी करीत असतांना सकाळी ४.३० वाजेच्या सुमारास एक चारचाकी मोठे वाहन व त्याच्या पाठीमागे एक इनोव्हा वाहन भरधाव वेगाने येतांना दिसले.
पथकाने टॉर्चच्या सहाय्याने वाहन उभे करण्याचा इशारा दिला. मात्र चालकाने वाहन भरधाव वेगाने पुढे नेले. पथकाने वाहनाचा पाठलाग केला. परंतु चालकाने काही अंतरावर वाहन उभे करून सोडून पळ काढला. तरीही पथकाने पाठलाग करुन शिताफीने चालकाला ताब्यात घेतले. शिवाजी बाबुलाल चौधरी (वय २९, रा.पडावद ता.शिंदखेडा जि.धुळे ह.मु. जगतापवाडी नंदुरबार) असे त्याचे नाव असून त्याचा साथीदार पळून गेला.
महिंद्रा पिकअप वाहन (क्रमांक एमएच-३९ सी-७३०६) ची तपासणी केली असता त्यात १४ लाख ४० हजार ७६८ रूपये किंमतीचे २५६ खाकी रंगाच्या पृष्ठाचे बॉक्स होते. त्यावर माल्ट व्हीस्की असे इंग्रजीत लिहिलेले होते. प्रत्येक बॉक्समध्ये रॉयल ब्ल्यू माल्ट व्हीस्की १८० मिली PIGGOT CH­APMA­N A­ND CO असे लेबल असेलेले प्लास्टीकच्या सिलबंद बाटल्या एकुण ४८ नग होत्या.
त्याचप्रमाणे एकुण १२ पॉलीथिन थैली प्रत्येकी थैली एकुण ४८ नग नमुद वर्णनाच्या व्हिस्कीच्या बाटल्या अश्या एकुण १२ हजार ८६४ नग बाटल्या प्रत्येकी बाटलीची किंमत ११२ रुपये आढळून आली. ६ लाख रुपये किमतीचे महिद्रा पिकअप वाहन (क्रमांक एमएच३९-सी-७३०६) असा एकुण २० लाख ४० हजार ७६८ रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला.
सदर मुद्देमाल, पिकअप वाहन ही पोलीसांनी कायदेशीर प्रक्रीया करून ताब्यात घेतले. सदर दारू कोणाची आहे असे ताब्यात घेण्यात आलेल्या इसमास विचारणा केली असता, त्याने सदरचा माल हा जगतापवाडी मध्ये राहणारा मुकेश अर्जुन चौधरी याचा असल्याचे सांगीतले. मुकेश चौधरी यालादेखील जगताप वाडी येथून ताब्यात घेण्यात आले.त्यावेळी त्याच्या घरासमोर उभी असलेली टोयोटा कंपनीची इनोव्हा क्रिस्टा पांढर्‍या रंगाची (क्रमाकं एमएच-४३- व्ही-६३५४) वाहनाबाबत विचारले असता सदर गाडी ही त्याचीच असल्याचे सांगीतले. तिची तपासणी केली असता त्यात ४ लाख ३० हजार ८० रूपये किंमतीचे एकुण ८० खाकी रंगाचे पृष्ठाचे बॉक्स, त्यावर माल्ट व्हीस्की असे इंग्रजीत लिहिलेले बॉक्स होते.त्यात प्रत्येकी बॉक्स मध्ये ठरॉयल ब्ल्यू माल्ट व्हीस्की १८० मिली PIGGOT CH­APMA­N A­ND CO असे लेबल असेलेले प्लॉस्टीकच्या सिलबंद बाटल्या एकुण ४८ नग मिळूनप आल्या. व्हिस्कीच्या बाटल्या अश्या एकुण सर्व ३ हजार ८४० नग बाटल्या प्रत्येकी बाटलीची किंमत ११२ रुपये, २१ लाख रुपये किमतीचे टोयोटा कंपनीचे इनोव्हा (क्रमाकं एमएच-४३-व्ही-६३५४) असा एकुण २५ लाख ३० हजार ८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही इसमांच्या वाहनातून एकुण १८ लाख ७० हजार रुपये किमतीची अवैध विदेशी दारु व २७ लाख रुपये किमतीचे दोन चारचाकी वाहने असा एकुण ४५ लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करुन जप्त करुन ताब्यात घेण्यात आला. या दोघांसह पळुन गेलेल्या एका इसमाविरुध्द् नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ६०१/२०२३ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५(ई), १०८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कारवाई पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील, पोलीस उप निरीक्षक विकास गुंजाळ, पोलीस हवालदार जगदीश पवार, राजेश येलवे, दिपक गोरे, पोलीस नाईक भटु धनगर, बलविंद्र ईशी, स्वप्नील पगारे, नरेंद्र चौधरी, पोलीस अंमलदार किरण मोरे, इम्राण खाटीक, राहुल पांढारकर, अनिल बडे, युवराज राठोड यांच्या पथकाने केली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
2:19 pm, January 13, 2025
temperature icon 27°C
साफ आकाश
Humidity 33 %
Wind 11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!