नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

घरकुल घोटाळ्यातील आरोपी यांच्यावर कधी होणार कारवाई ..?

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- प्रविण चव्हाण

नंदुरबार -: अक्कलकुवा तालुक्यातील रामपूर येथे घरकुल घोटाळ्यातील आरोपी यांच्यावर अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई झाली नसल्याने 18 जुलै रोजी रास्ता रोको आंदोलनाच्या आमदार आमश्या पाडवी यांचा इशारा तहसीलदारांना दिले निवेदनाद्वारे केली.

अक्कलकुवा तालुक्यातील रामपूर येथे मुळ आदिवासी लाभार्थी यांच्या नावे मंजूर घरकुलच्या लाभ हा इतरांच्या बँक खात्यात दिला गेला तसेच अनेक मंजूर पात्र लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळून त्या जागी दुसऱ्या अपात्र व्यक्तींची नावे समाविष्ट केले गेले असल्याचे आमदार आमश्या पाडवी यांनी वेळोवेळी निदर्शनास आणून दिले त्यानुसार झालेल्या चौकशी अंतिम अनेकांवर दोष निश्चित करण्यात आली परंतु या प्रक्रियेत मुख्य भूमिका असणारे तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक, गट विकास अधिकारी तसेच इतर कर्मचारी यांच्यावर मात्र वरदहस्त ठेवत सर्व कारवाईतून त्यांना दूर ठेवण्यात आले तसेच मूळ लाभार्थी यांना अद्याप पर्यंत मंजूर घरकुल अनुदानाच्या लाभ देण्यात आलेला नाही या सर्व सुमारे 3 वर्षाच्या कार्यकाळात लाभापासून वंचित असलेल्या मूळ लाभार्थी यांच्यापैकी 4 लाभार्थी यांचा मृत्यू देखील झाला आहे ही बाब मी ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्यात देखील निदर्शनात आणून दिली तरी अद्यापही कोणतीही ठोस कारवाई न होता केवळ कागदी घोडे नाचवले जात आहे ही बाब अत्यंत निंदाजनक असून या प्रकरणात दोषी असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्य वधाच्या गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी मृतांच्या परिवारांची तसेच समस्त आदिवासी समाजातून होत आहे सदर मृतांचा कुटुंबियांनी संबंधितावर गुन्हा दाखल व्हावे यासाठी अक्कलकुवा पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज देखील दिला आहे तरी देखील रामपूर तालुका अक्कलकुवा येथील घरकुल घोटाळ्यातील सर्व दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर अध्याप ठोस कारवाई करण्यात टाळाटाळ करीत घोटाळ्यास अप्रत्यक्ष समर्थन देण्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांचेवर कारवाई झालेली नाही येत्या 7 दिवसात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रशासनाला देण्यात आला होता तरीदेखील अद्याप पर्यंत कोणतीही प्रकारची कारवाई झालेली नसून उलट मयतांच्या वारसांना त्रास देण्याचा प्रकार सुरू असून त्यामुळे जनतेच्या रोष वाढत आहे जनतेच्या रोष पाहता वंचित लाभार्थ्यांना न्याय हक्कांसाठी दिनांक 18 जुलै रोजी अक्कलकुवा तहसील कार्यालया समोर सकाळी 11 वाजता मयतांचा वारसदार व वंचित लाभार्थी यांच्यासोबत रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात सांगितले आहे यावेळी तहसीलदार रामजी राठोड यांना निवेदन देण्यात आले यावेळी आमदार आमश्या पाडवी, शेतकरी सहकारी संघाचे चेयरमैन पृथ्वीसिंग पाडवी, तालुका प्रमुख मगन वसावे, युवती सेना जिल्हा प्रमुख मालती वळवी, मा. सरपंच राजेन्द्र वसावे, विनोद वळवी, तालुका उप प्रमुख तापसिंग वसावे, आनंद वसावे आदीं पदाधिकारी व कार्यकर्ते सह लाभार्थी व त्यांचे वारसदार उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:27 am, January 15, 2025
temperature icon 30°C
टूटे हुए बादल
Humidity 32 %
Wind 23 Km/h
Wind Gust: 27 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:09 pm
Translate »
error: Content is protected !!