DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- फुलचंद वानखेडे
अकोला:- सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशन हद्दीतील जवाहर नगर ते राऊतवाडी मार्गावर तीन नेट कॅफेवर सदर परिसरातील नागरिकांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी दामिनी पथकाच्या माध्यमातून धडक कारवाई करून 20 युवक युवतींना ताब्यात घेतले. यावेळी त्यांना अश्लील चाळेकरतांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली .शहरातील जवाहर नगर ते राऊतवाडी मार्गावर जॉईंट नेट कॅफे ,द बॅक स्टेज कॅफे ,आणि ट्युस्ट अँड टर्न कॅफे असून या नेट कॅफेमध्ये काही युवक व युवती चाळे करीत असल्याने परिसरातील नागरिक प्रचंड त्रस्त झाले होते. या प्रकरणाच्या अनेक तक्रारी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे करण्यात आल्या होत्या .दामिनी पथकाच्या प्रमुख पोलीस निरीक्षक उज्वला देवकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात सदर कारवाई करण्यात आली. सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात सदर युवक युवतीच्या पालकांना बोलावून समज देण्यात आली. तसेच युवक युवती विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा 110 117 प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. सदर परिसरात खाजगी कोचिंग क्लासेस असून या धडक कारवाईने पालक जागरूक झाले आहेत.