DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा
साक्री :- कर्नाटक राज्यामध्ये जैन मुनींच्या अमानुषपणे हत्या करणाऱ्या दोषींना कठोर शासन होणे व व्हावे याबाबत साक्रीचे तहसीलदार सुरेश सोनवणे व साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोतीराम निकम यांना निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यात जैन मुनि दिगंबर जैन आचार्य श्री 108 कामकुमारनंदीजी गुरु महाराज यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली आहे. सदर घटना ही अतिशय निंदनीय व काळीमा फासणारी घटना आहे. सदर घटनेमुळे संपूर्ण भारततील सकल जैन समाजामध्ये व जैन साधुसंतांमध्ये सरकार बद्दल खूप रोष निर्माण झाला आहे. तरी पुढील जैन साधूंच्या रक्षणासाठी योग्य तो उपाय नियोजन सरकारने करावे अशी जैन बांधवांकडून मागणी होत आहे.
जैन मुनींची हत्या करणाऱ्या हत्यारांना लवकरात लवकर शोधून कठोरात कठोर शासन करण्यात यावे व पुढे अशी घटना घडणार नाही याबाबत सरकारने वेळीच लक्ष देऊन समस्त जैन बांधवांना न्याय द्यावा ही नम्र विनंती असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी राजेंद्र मदनलाल संचेती अध्यक्ष स्थानकावासी संघ साक्री, अनिल रुपचंद कांकरिया तेरापंथ सभा अध्यक्ष, सौ. जोशीला अमरचंद पगारिया भारतीय जैन संघटना धुळे जिल्हा अध्यक्ष, किरण रामचंद्र टाटिया उपाध्यक्ष स्थानक, नितीन पन्नालाल कर्नावट तेरापंथ सभा उपाध्यक्ष, डॉ. कोमल हुकूमचंद कांकरिया तेरापंथ सभा मंत्री, विनोद सुवालालजी पगारिया भारतीय जैन संघटना शहर अध्यक्ष, निखिल दिलीप टाटिया युवा परिषद अध्यक्ष, पियुष संजय कर्णावट युवा परिषद अध्यक्ष, साक्री, सकल जैन समाज बांधव आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.