DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकील शहा
साक्री : साक्री तालुक्यातील आदिवासी परीवार महाराष्ट्र संघटनेच्या वतीने दि. 20 जुलै 2023 रोजी साक्री चे तहसीलदार सुरेश सोनवणे यांना महामहिम राष्ट्रपती यांच्या नावाने निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनामध्ये केंद्र सरकारद्वारे नव्याने प्रस्तावित होणाऱ्या समान नागरी संहिता हा कायदा आदिवासी समाजाला लागू करू नये अशी मुख्य मागणी करण्यात आली आहे. या वेळी तालुकाभरातून आदिवासी बांधव मोठ्या संख्येने तहसील कार्यालयात एकत्र उपस्थित होते. त्यांच्या वतीने आदिवासी एकता जिंदाबाद, लढेंगे जितेंगे अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या.
संघटनेचे नेतृत्व लाखन पवार, इंजिनीयर अशोक सोनवणे, उत्तम माळचे, बापू भील, प्रेमचंद सोनवने, संजय ठाकरे, विष्णु सोनवने, बंटी अहिरे, नंदू माळचे, प्रल्हाद पवार आदि पदाधिकारी यांनी केले होते.