DPT NEWS NETWORK ✍️. प्रतिनिधी – संदिप अहिरे
धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धुळे जिल्हा निरीक्षक पदी श्री.उमेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
काल मुंबई येथील राष्ट्रवादी भवन मध्येे प्रदेशाध्यक्ष श्री.जयंतराव पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी ग्रंथालय विभागाच्या राज्य समन्वयक सौ.रिटा बाविस्कर उपस्थित होत्या. त्यांच्या नियुक्ती बाबत शहर जिल्हाध्यक्ष श्री.रणजीत राजे भोसले यांनी अभिनंदन केले आहे.
उमेश पाटील यांनी 1999 ला ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना झाली, त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गावाच्या अध्यक्षापासून कामास सुरुवात केली. 2005 ला तालुका कार्यकारणीवर त्यांना घेण्यात आले. 2008 ला जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा सरचिटणीस पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांचे काम बघून 2015 साली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ग्रंथालय विभागाच्या प्रदेश समन्वयक पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. प्रदेश समन्वयक म्हणून काम करत असताना त्यांनी संपूर्ण राज्यात संघटना बांधणीचं काम फार मोठ्या प्रमाणावर केले. सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याच कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी त्यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती व्हावी म्हणून आदरणीय श्री.जयंत पाटील साहेबांकडे मागणी केली. त्यानंतर जयंत पाटील साहेबांनी 2018 मध्ये त्यांना उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांचा राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांचं काम बघून 2019 ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रंथालय विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र चार ते पाच वेळा पिंजून काढला व चांगल्या कार्यकर्त्यांची फळी तयार केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आयोजित केलेल्या अभिप्राय अभियान मध्ये सर्व फ्रंटल व सेल मध्ये तीन नंबरला येऊन एक रेकॉर्डच तयार केला. त्यामुळे त्यांचं ते काम बघून आदरणीय पवार साहेब,आदरणीय जयंत पाटील साहेब व आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या फारच जवळ त्यांना जाता आले. आदरणीय पवार साहेब, जयंत पाटील साहेब व सुप्रियाताई यांच्या मर्जीतले म्हणून त्यांची ओळख तयार झाली. 16 जून 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभागाचे राज्यस्तरीय अधिवेशन आदरणीय पवार साहेब,आदरणीय जयंत पाटील साहेब, यांच्या उपस्थितीत घेऊन त्यांनी आपल्या कामाची वेगळी छाप पाडली. तसेच २०२२ तसेच २०२३ रोजी ३० जून रोजी मा.खा. सौ. सुप्रियाताईच्या वाढदिवशी ग्रंथतुला केली तसेच आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील ३६ जिल्हयात शरद स्पर्धा परीक्षा संच वाटप अभियान सुरु केली जेणेकरुन ग्रामीण भागातील विद्यार्थीना मोठया प्रमाणात भावी वाटचालीस पुढील पिढीस सहकार्य केली. त्याचीच पोचपावती म्हणून आज त्यांची धुळे जिल्हा निरीक्षक पदी नियुक्ती झाली.