DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – (दिप्ती पाटील)
उरण :– उरण तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे उरण तालुक्यातील २३ गावांनां पावसाच्या पाण्याचा पटका बसला आहे. तेवीस गावात पाणी शिरले आहे. खोपटा, जुई, कोप्रोलि, जेएनपीटी, नवघर, पागोटे, धाकटीजुई, नवघरपाडा, जासई, दिघोडे, कळबुसरे, विधने भेंडखळ, चिरनेर अशा तेवीस गावांचा पंचनामा व उरणचे तहसीलदार कदम साहेब व धुमाळ भाऊसाहेब करीत आहेत.

चिरनेर गावात मंगळवारी पहाटे चार वाजल्यापासून गावात पाणीच पाणी साचल्यामुळे गावात पुरस्थिती निर्माण झाली आहे. चिरनेर गावातील सर्व लाईट गेली आहेत.
उरण येथील राणसई धरण पुर्ण भरले असुन मंगळवारीच ९० दशलक्ष घनमीटर पाणी साचले होते. त्यामुळे रानसई धरण ओसंडून वहात आहे.

प्रादेशिक हवामान खात्याने धोकादायक मुसळधार पावसाची शक्यता दर्शविली असताना उरण येथील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालय ठिकाणी वास्तव्य करणे बंधनकारक असतानाही उरणमधील बहुतांश शासकीय अधिकारी व कर्मचारी वर्ग हे मुख्यालयी वास्तव्यास न होते .
सार्वजनिक बांधकाम उपविभाग उरण यांनी राज्य मार्ग रस्ता नंबर १०३ उरण पनवेल नवघर ते जेएनपीटी समोरी दिड किलोमीटर लांबीचा रस्ता मे २०२३ मध्ये एक कोटी पंधरा लाखा रुपये खर्च करून तयार केला आहे. संध्या हा रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे. या मार्गावरील सर्व वाहतूक बंद असुन संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेला आहे. याला जबाबदार कोण? निकृष्ट दर्जाचे काम होण्यामागे लाचखोर शासकीय अधिकारीच असतात सर्व सामान्य नागरिक बोलले जात आहे.



