नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

*दर्शन पोलीस टाईम*

संपादकीय…………….

दि. 24/07/2023

*शहाणपण देगा देवा!*

*वर्तमानपत्र अथवा इतर माध्यमांत देखील आपण ज्या चवीने राजकीय बातम्या बघतो त्याप्रमाणात वाचक, प्रेक्षक आर्थिक बातम्यांची दखल घेत नाही.*


समाज माध्यमांवर जे काही येतं ते सर्व काही चुकीचं आणि वाईट आहे असं नाही. सध्या असाच एक चलनात असलेला शब्द म्हणजे ‘फोमो’ अर्थात ‘फिअर ऑफ मिसिंग आउट’ म्हणजे काय तर समजा सध्या शेअर बाजारात सध्या जी काही तेजी सुरु आहे त्यामुळे आपण जर त्यात काही पैसे गुंतवले नाही तर आपली संधी हातची जाईल यामुळे अस्वस्थ होऊन त्यात सामील होण्याचा प्रयत्न करणे होय. हातची संधी घालविण्याची भीती असा त्या ‘फोमो’ चा एक सरधोपट अर्थ सांगता येईल.
हे सांगायचे कारण काय तर याच मनोवस्थेचा फायदा घेऊन लोकांची आर्थिक लूट होण्याची अनेक उदाहरणे आजूबाजूला घडतांना दिसत आहेत. कधी शेअर मार्केट च्या नावाने तर कधी क्रीप्टो करन्सी च्या नावाने असले उद्योग आर्थिक गुन्हेगारांकडून केले जात आहे. हे एवढ्यापुरताच मर्यादित नाही अगदी सोने चांदी मधील चढ उताराचा फायदा घेऊन तुम्हाला मोठा नफा मिळवून देऊ असले भरगोस आश्वासन देऊन देखील अनेक जन लुटले जात आहेत. याशिवाय पार्ट टाईम ऑनलाईन नोकरी मिळवून देणे, विशिष्ट वस्तुत पैसे गुंतवून पैसे मिळवून देऊ असे सांगून आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे आजवर वारंवार घडते आहे. यासाठी मोठी आमिषे दाखविली जातात. कधी इतक्या दिवसात पैसे दुप्पट तर कधी २४ टक्के व्याज यांसह अशी काही आमिष दाखविले जाते की समोरच्याला भुरळ पडावी आणि यांत तो पैसे गुंतवून बसतो आणि शेवटी आपल्या कष्टाचा पैसा गमावून बसतो.
जेव्हा सामान्य माणसाला यांत आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात येते तेव्हा अनेक प्रकरणात तर आपली नाचक्की होईल यामुळे तो हे प्रकरण उघडकीस येऊ नये यासाठी शांत बसतो आणि तक्रार देखील दाखल करत नाही. तसेच बाहेर कुठे सांगितले तर “हव्यासापोटी” कष्टाचा पैसा गमावला असे उलट त्याला ऐकवले जाते. इंटरनेट च्या या युगात नवनवीन मार्गाने आपल्याभोवती आमिषे पेरली जातात त्याला काही जण बळी पडतात. हे थांबविण्यासाठी अर्थसाक्षरता खूप महत्त्वाची आहे. आपले पैसे कुणी आपला नातेवाईक, ओळखीचा सांगतो म्हणून न गुंतवता आपल्या कुटुंबाच्या भविष्यातील निकड पाहून गुंतविला पाहिजे. जसे आपण घर बांधण्यासाठी वास्तुविशारदाचा सल्ला घेतो त्याचप्रमाणे आपली आर्थिक गुंतवणूक कशी असावी यासाठी देखील आर्थिक सल्लागाराचा पर्याय कधीही चांगला ठरतो.
मध्यमवर्गीय अनेकदा या आर्थिक फसवणूकीला बळी पडत असल्याचे निदर्शनास येते आहे. हे टाळण्यासाठी नव्या काळाची नवी आव्हाने समजावून घेऊन त्यांचा सामना करता यायला हवा. अन्यथा आपला पैसा असाच कुणीतरी गुन्हेगार आपल्यादेखत घेऊन जाईल. आमिष दाखवून फसवणूक होणे हा एक भाग झाला दुसऱ्या बाजूला बनावट फोन च्या माध्यमातून आपल्या बँकेतील पैसे काढले जाणे, ऑनलाईन आर्थिक फसवणूक होणे यांसारखे आर्थिक गुन्हे देखील मोठ्या संख्येने वाढतांना दिसत आहेत. यासाठी तर संघटीत गुन्हेगारीच्या स्वरूपात टोळ्या काम करतांना आढळतात. पोलिसांनी यावर आळा घालण्यासाठी अनेकप्रकारे उपाय केले तरी गुन्हेगार देखील एक पाऊल पुढे टाकत या आर्थिक फसवणुकीच्या खेळात आपले अस्तित्व टिकवून ठेवत आहे. तेव्हा जर आपली आर्थिक फसवणूक झाली तर पोलिसांकडे तक्रार करणे आवश्यकच आहे पण तरीही जर आपण सावधानता बाळगली तर गुन्ह्याच्या पहिल्या टप्प्यातच आपला त्यापासून बचाव होऊ शकतो.
वर्तमानपत्र अथवा इतर माध्यमांत देखील आपण ज्या चवीने राजकीय बातम्या बघतो त्याप्रमाणात वाचक, प्रेक्षक आर्थिक बातम्यांची दखल घेत नाही. त्यामुळे आर्थिक साक्षरतेबाबत अलीकडे इंटरनेट मुळे सजगता वाढली असली तरी या ठिकाणी मोठा पल्ला गाठणे अजून बाकी आहे. अर्थव्यवस्था बदलते आहे तशी त्यांत सामान्यांचा देखील त्यांत सहभाग वाढतो आहे, अशावेळी आपण नक्की कशात पैसा गुंतवतो आहोत, त्याचे उद्दिष्ट काय आणि त्यात सुरक्षा किती आहे आणि जोखीम किती आहे याची माहिती गुंतवणूकदाराने करून घेणे क्रमप्राप्त आहे. आपली जेवढी जोखीम आहे तितकेच पैसे गुंतवले तर भविष्यात होणारा मनस्ताप आपण टाळू शकतो. फक्त आपले नातेवाईक, शेजारी, मित्र पुढे चालले या इर्षेने जर आपण गुंतवणूक करायला गेलो तर आपल्या हातात केवळ पश्चाताप उरेल याचा सारासार विचार व्हायला हवा.
समाज माध्यमांवर देखील स्वत:ला ‘इंफ्लूएन्सर’ म्हणवून घेणारे तथाकथित ‘उत्सवमूर्ती’ आपल्यावर प्रभाव टाकण्यासाठी स्वत:च्या फायद्यासाठी जाहिराती करतात, विशिष्ट ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला शिफारस करतात मात्र जेव्हा यांत सामान्य माणसाला पश्चातापाची वेळ येते तेव्हा तो लोकप्रिय, सर्वांचा लाडका वगैरे ‘उत्सवमूर्ती’ दुसरेच कुठलेतरी उत्पादन आपल्या माथी मारण्याच्या प्रयत्नात असतो.

सामन्यांसाठी आवाज उठविणे हे पत्रकारितेचे निहित कर्तव्य आहे यांत शंका नाही मात्र याचसोबत वाचकांना, प्रेक्षकांना शिक्षित करणे, त्यांना सजग करणे हे देखील पत्रकारांचे आवश्यक कर्तव्य आहे. तेव्हा आर्थिक फसवणुकीचे गुन्हे नेहमी समोर येत असतात त्यांच्या विरोधात दर्शन पोलीस टाईम माध्यम म्हणून नेहमीच आवाज उठवत असतो. पण त्याचबरोबर वाचकांना सजग करणे, शिक्षित करणे देखील तितकेच महत्त्वाचे म्हणून हा प्रपंच!

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:08 pm, January 13, 2025
temperature icon 24°C
साफ आकाश
Humidity 41 %
Wind 13 Km/h
Wind Gust: 15 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!