DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी – अकील शहा. साक्री: दहिवेल गावाजवळ द बर्निंग ट्रकचा थरार, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर असलेल्या दहिवेल गावापासून अवघ्या चार ते पाच किलोमीटर अंतरावर राधिका हॉटेल समोर दि. ०६/०८/२०२३ रोजी संध्याकाळी ०३:३० वाजेच्या सुमारास सुरत कडून धुळे कडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक NL 01 AF 5283 व मालवाहतूक रिक्षा मध्ये गंभीर अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार खड्डे वाचविण्याच्या नादात ट्रक आणि रिक्षा मध्ये अपघात झाला, अपघातात दोन्ही वाहने पलटी होऊन दोन्ही वाहनांनी पेट घेतला या अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी झाला असुन त्याला स्थानिक नागरिकांच्या मदतीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालय धुळे येथे दाखल करण्यात आले आहे.
यावेळी रस्त्यावरती आगीचा आगडोंब एवढा भयानक होता की रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनधारकाला या आगीची शेक लागत होती घटनेची माहिती मिळताच साक्री पोलीस स्टेशनचे कर्मचारी पोलीस हेडकॉन्स्टेबल नूर पिंजारी, एएसआय राजू जाधव, कॉन्स्टेबल दिनेश मावची घटनास्थळी दाखल झाले व तसेच साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोतीराम निकम साहेब घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळी अग्निशामक वाहन उशिरा पोहोचल्यामुळे व तसेच वाहनामध्ये प्लास्टिकचे दाणे भरलेल्या गोण्या असल्यामुळे वाहनाचे व वाहनांमधील मालाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी लक्ष्मी मोटर गॅरेज चे मालक जगदिश थोरात यांनी तात्काळ जेसीबी व क्रेन मालकाशी संपर्क साधला व रात्री उशिरापर्यंत क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त वाहनांना रस्त्याच्या बाजूला सारून रहदारीचा मार्ग मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू होते या वेळी सामाजिक कार्यकर्ते पप्पू कोळी, योगेश पाटील, भूषण बच्छाव, पवन संदानशिव, केरला टायर वाला, आप्पा गावडे, डाल्या बच्छाव, आदीनी मदत कार्य केले.