DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – अकिल शहा
साक्री : साक्री शहरापासून अवघ्या ५ ते ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या शेवाळी(दा.) गावाची लोकसंख्या ५००० च्या वरती आहे या गावातून दररोज हजारो प्रवाशी साक्री येथे येण्या-जाण्यासाठी प्रवास करीत असतात. गावामधील सरकारी दवाखान्याजवळ स्थानिक आमदार विकास निधीतून मागिल वर्षी प्रवाशी शेड उभारण्यात आले आहे. त्यामुळे काही प्रवाशी या ठिकाणी थांबतात अशा वेळी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस या ठिकाणीही थांबायला पाहिजे अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने केली जात आहे.
हात दाखवा आणि बस थांबवा हा उपक्रम फक्त नावालाच आहे. नेहमी तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाने मध्यंतरी प्रवाशांनी प्रतिसाद द्यावा म्हणून हात दाखवा आणि बस थांबवा उपक्रम सुरू केले होते. चार दिवस दाखवण्यासाठी हा उपक्रम यशस्वी झाला नंतर वाहक व चालक यांच्या मनमानी कारभारामुळे हात दाखवून सुद्धा बस थांबत नाही अशी तक्रार ग्रामस्थांच्या वतीने आगार प्रमुख यांच्या कडे करण्यात आली तरी आपण सर्व वाहक -चालक यांना शेवाळी येथे दोन ठिकाणी बस थांबवण्याच्या सूचना द्याव्यात अशा आशयाचे निवेदन दि. ०४/०८/२०२३ रोजी चर्चा करून साक्री आगार व्यवस्थापक किशोर अहिरराव यांना देण्यात आले.
यावेळी ग्रामसुधार मंडळाचे चेअरमन साहेबराव साळुंके, सचिव सुरेश रूपचंद साळुंके, यादवराव राजाराम साळुंके, भिला डोंगर साळुंके, मच्छीद्र नारायण साळुंके, गुलाब दाभाडे, उखाजी दगा साळुंके, गुलाब नांद्रे, पोपट गंगाराम साळुंके आदि ग्रामस्थ उपस्थित होते.