DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – भुवनेश दुसाणे
पाचोरा – येथील साप्ता.झुंज व ध्येय न्युज
यु – ट्यूब तथा वेब न्रूज चॅनेलचे पत्रकार संदीप दामोदर महाजन हे गेल्या 27 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहे. तसेच त्यांनी शासनाच्या जळगाव जिल्हा पत्रकारांवर होणारे हल्ले व उपाययोजना समितीवर अशासकीय सदस्य म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. विशेष बाब म्हणजे संदीप महाजन हे पत्रकार तर आहेतच त्याच बरोबर बाल वयातच स्वातंत्र चळवळीत भाग घेतल्याने ब्रिटीश कालीन येरवाडा जेलमध्ये सहा महिन्याचा कारावास भोगलेले स्वर्गीय स्वातंत्र्य सैनिक आण्णासाहेब दामोदर लोटन महाजन यांचे ते सुपुत्र आहेत.
अशा आमच्या सन्माननीय जेष्ठ पत्रकारास स्थानिक आमदार किशोर पाटील यांच्या कडून झालेल्या असंविधानिक व अर्वाच्य शिवीगाळ बद्दल, व तालुक्यातील सजग व सतर्क पत्रकाराला दिलेल्या धमकीबद्दल आम्ही निवेदनाद्वारे निषेध नोंदवत असून सोबतच संदीप महाजन यांनी ई-मेलद्वारे केलेल्रा तक्रारीची दखल घेवून त्यांची तक्रार नोंद व्हावी व त्यांना विनामूल्य पोलिस संरक्षण मिळावे अशा मागणीचे पत्र पाचोरा येथील पत्रकार बांधवांनी पाचोरा प्रांताधिकारी यांना दिले.