DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी – सोमनाथ पारसे बारामती : वडगाव निंबाळकर पोलिसांनी बंधाऱ्याचे दरपे व बांधकामाचे लोखंड चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा केला पर्दाफाश वडगांव निंबाळकर पोलिसांनी आरोपींना अटक करून 6,00,950/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक. 18/02/2023 रोजी ते दिनांक 19/02/2023 रोजी दरम्यान कृषी मुल शिक्षण संस्था काऱ्हाटी येथील वॉल कंपाउंड चे बांधकामाचे 1,10,150/- रुपये किमतीचे मटेरियल अज्ञात चोरट्याने चोरी केली होती. सदर फिर्यादीवरून वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.नं 47/2023 भादवी 379 प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्याचा तपास हा गोपनीय माहिती व तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला असता आरोपी 1) अक्तार जमीर शेख वय 28 वर्ष, राह- येवलेवाडी, कमाण निंबाळकरवस्ती ता. हवेली जि. पुणे मुळ राहनार अंजली नगर लातूर जि. लातूर 2) लवकुश कुमार रोहिदास वय 22, राह – येवलेवाडी ता. हवेली जि.पुणे मूळ राहणार – सुकरी ता. निवास जि. मंडला राज्य मध्यप्रदेश. 3) विजय नरसिंग साहू वय 23, सध्या राहणार- येवलेवाडी ता. हवेली जि. पुणे मूळ राहणार- जगनीया ता. निवास जि.मंडला राज्य मध्यप्रदेश. 4) धर्मेंद्र रमेश चौधरी वय 27, सध्या राहणार- येवलेवाडी ता. हवेली जि. पुणे मूळ राहणार- सहपुरा जि. डिडोरी राज्य मध्य प्रदेश. 5) राहुल गौतम बोरकर वय 27, सध्या राहणार- येवलेवाडी ता. हवेली जि. पुणे मूळ रहाणार- पातुर ता. पातुर जि.अकोला .6) फिरोज फतेह मोहम्मद खान वय 42 ,सध्या राह-हडपसर भेकराईनगर ता. हवेली जि. पुणे यांनी सदरचा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले. असून त्यांनी आणखी अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. आरोपी 1 ते 6 यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले वाहन टाटा कंपनीचा इंन्टा टेम्पो नं. एम .एच. 12 ए एक्स 4493 हा 4,00,000/- रुपये किमतीचा गुन्ह्याचेकामी जप्त करण्यात आला असून गुन्हातील चोरीस गेलेला एकूण 2,00,950/-रु किमतीचा मुद्देमाल असा एकूण 6,00,950/- रु किमतीचा मुद्देमाल आरोपी कडून जप्त करण्यात आला आहे. सदरची कामगिरी ही मा. श्री. अंकित गोयल सो. पोलीस अध्यीक्षक पुणे ग्रामीण, मा .श्री. आनंद भोईटे सो, अप्पर पोलीस अध्यीक्षक, बारामती विभाग, मा. श्री. गणेश इंगळे सो, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग, मा. श्री. अविनाश शिळीमकर पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे, पोलीस हवालदार राहुल भाग्यवंत, अनिल खेडकर, अनिल दणाणे , हिरामण खोमणे ,हदयनाथ देवकर, पोपट नाळे, अमोल भुजबळ, होमगार्ड अक्षय बारवकर, पोलीस मित्र परेश भापकर यांनी केलेले आहे.