नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

बारामती तालुका पोलीस स्टेशन तपास पथकाची धमाकेदार कामगिरी


DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – सोमनाथ पारसे

बारामती : एमआयडीसी बारामती तालुका परिसर, फलटण व वडगाव निंबाळकर येथे चोरी झालेल्या एकूण आठ बुलेट, पल्सर, यामहा अशा महागड्या मोटरसायकल एकूण किंमत 3,00,000/-रुपये किमतीच्या मोटारसायकल चोरी करणारे चोर पकडले. चोरलेल्या मोटरसायकल ही जप्त करण्यात आलेल्या आहेत.

बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीत एमआयडीसी परिसरामध्ये मोटरसायकल चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री प्रभाकर मोरे यांनी तपास पथकास सदर चोरट्यांना लवकरात लवकर शोधून काढण्याबाबत सक्त सूचना व मार्गदर्शन केले होते. त्यावरून तपास पथकाचे पोलीस अंमलदार राम कानगुडे, पोलीस कॉन्स्टेबल दत्ता मदने, शशिकांत दळवी व संतोष मखरे यांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. तांत्रिक माहितीच्या आधारे तसेच गोपनीय माहिती द्वारे चोरट्यांची माहिती काढली त्यामध्ये हे चोरटे भादवी कलम 395 दरोड्या सारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये देखील आरोपी असल्याचे समजले. त्यामुळे मोठ्या शितापीने वेशांतर करून आरोपींचा मोटरसायकलवर पाटलाग करून आरोपी 1) पैगंबर उर्फ अजर तय्यब मुलानी वय 23 वर्ष रा सूर्यनगरी तालुका बारामती जिल्हा पुणे मूळ रा. नातेपुते मुलानी वस्ती तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर 2) गणेश हनुमंत बोराटे वय 23 वर्षे रा अवसरी तालुका इंदापूर पुणे यांना निमगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे वेगवेगळ्या युक्त्यांचा वापर करून चौकशी केली असता त्यांनी बारामती एमआयडीसी, वडगाव निंबाळकर, फलटण येथून मोटरसायकल चोरल्याची माहिती दिली. यामध्ये एक गाडी चोरण्यासाठी आरोपी क्रमांक दोन हा मुलानी याला मदत करीत होता तसेच आरोपी तय्यब मुलानी याचे दोन मित्र आणखी आहेत जे मोटरसायकल चोरीमध्ये माहीर आहेत त्यांचा शोध तपास पथक घेत आहे . त्यांना पकडल्यानंतर आणखी चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. या चोरी झालेल्या मोटरसायकल बाबतीत बारामती तालुका पोलीस स्टेशन वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन व फलटण पोलीस स्टेशन मध्ये खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
बारामती तालुका पोलीस स्टेशन
गुन्हा रजिस्टर नंबर
1)156/2023 भादवि कलम 379
2)124/2023 भादवि कलम 379
3)145/2023 भादवि कलम 379
4)398/2023 भादवि कलम 379
5)फलटण शहर पोलीस स्टेशन
गु.र. नंबर 398/2023 भादवि कलम 379
6)वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु. र. नंबर 300/23 भादवि कलम 379
एक RX 100 यामहा आशा
एकूण तीन लाख रुपयांचा मोटरसायकल चोरांकडून जप्त करण्यात आलेल्या आहेत. आणखी राहिलेल्या आरोपींचा शोध घेऊन अजून चोरी केलेल्या गाड्या मिळवण्याच्या उद्देशाने तपास पथक प्रयत्नशील आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक अंकित गोयल साहेब पुणे ग्रामीण , अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे साहेब बारामती विभाग पुणे ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे साहेब बारामती विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, पोलीस हवा. राम कानगुडे, पो. कॉ. दत्ता मदने, शशिकांत दळवी, संतोष मखरे यांनी केली आहे. सदर गुन्ह्यांचा तपास महिला पोलीस हवालदार शिरतोडे, नागरगोजे व पोलीस नाईक राजेंद्र काळे हे करीत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
1:04 pm, January 13, 2025
temperature icon 25°C
साफ आकाश
Humidity 36 %
Wind 10 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!