नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

धुळे आझाद नगर पोलिसांची दमदार कारवाई, मिरची गँगचा आवळल्या मुसक्या

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – संदीप अहिरे

धुळे :- धुळे जिल्हयात मागील काही दिवसापासून महामार्गावर प्रवास करणा-या इसमांना त्यांचे डोळयात मिरचीची पावडर फेकुन गावठी बनावटीचे पिस्तुलचा वापर करून धमकी देवून जवरदस्तीने त्यांचेकडुन रोख रक्कम, मोबाईल व मोटार सायकल हिसकावून पळुन जाणे असे गुन्हे घडत होते त्याबाबत मा पोलीस अधिक्षक श्री संजय बारकुंड सो यांनी सदर प्रकारचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना निर्गमीत केलेल्या होत्या. दिनांक १५/०८/२०१३ रोजीचे २३.३० ते दिनांक १६/०८/२०२३ रोजीचे सकाळी ०६.०० वा पर्यंत आझाद नगर पोलीस ठाणे हथीत गिंदोडीया चौक येथे नाकाबंदी व कोम्बींग ऑपरेशन राबविण्यात आलेले होते. नाकाबंदी व कोम्बींग दरम्यान पोनि श्री नितीन देशमुख यांना गुप्त बातमीदार याचे मार्फतीने बातमी मिळाली की, तिन इसम हे एका पांढ-या रंगाच्या एक्टीवा मोटर सायकल क्र. एम एच १८ बी पी ६३०८ वर बसुन पारोळा चौफुलीकडुन गिदोडीया चौकाकडे येणार असुन त्यांच्या जवळ गावठी बनावटीचे पिस्तुल आहे. अशी गुप्त बातमी बातमीदाराकडून मिळालेनंतर पो.नि. देशमुख यांनी आझादनगर पोलीस ठाण्यातील सपोनि पाटील व शोध पथकातील कर्मचारी यांना त्या बातमीची खात्री करून कारवाई करणेबाबत आदेशीत केले. त्यावरुन सपोनि. पाटील व पथकाने गिदोडीया चौक येथे दुचाकी वरून येणाऱ्या १) शेखर दत्तु वाघमोडे, वय २३ वर्षे रा.भोकर ता. जि. धुळे २) चेतन जिभाऊ पाटील, वय ३० वर्ष रा भोकर ता. जि. धुळे ३) विकास संजय केदारे, वय २५ वर्ष रा पश्चिम हडको, साईबाबा मंदीराजवळ, चाळीसगाव रोड, धुळे अशा तिन इसमांना ताब्यात घेतले असता त्यांचे ताब्यात एक गावठी बनावटीचे पिस्तूल तसेच एक जिवंत काडतुस मिळुन आले. म्हणून सदर इसमांना पोलिसांनी ताब्यात घेवून आझादनगर पोलीस ठाणे येथे आणुन त्यांच्या विरुद्ध आझादनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि नं २२८/२०२३ भादंवि कलम ३४ सह भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३/२५,२७ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) (३) १३५ प्रमाणेगुन्हा दाखल केला असुन गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख हे करीत आहेत. नमुद गुन्हयाचे तपासा करत असताना आरोपी यांना विश्वासात घेवुन त्यांचेकडे सखोल विचारपुस केली असता त्यांनी खालील प्रमाणे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. २) दिनांक ०९/०८/२०१३ रोजी रात्रीचे सुमारास नगाववारीच्या पुढे पोददार इन्टरनॅशनल शाळेजवळील मुबई आग्रा महामार्ग क्रमांक ३ वर एका इसमास आवाज देवुन त्यास थांबवून तु भूषण ला का मारले असे बोलून त्याचे डोळयात मिरीचीची पावडर टाकुन त्याचे शर्टच्या खिशातून एक मोबाईल काढून घेवुन त्यास ढकलुन देवून त्याचेकडील सुपर स्प्लेंडर मोटार सायकल ही जबरदस्तीने हिसकावुन घेतलेली होती. असे सांगितलेने पश्चिम देवपुर पोलीस ठाणे येथे संपर्क साधुन अभिलेख तपासणी केली असता त्याबाबत पश्चिम देवपर येथे भाग ५ गुन्हा रजि नं २३४ / २०२३ भादंवि कलम ३९४.३४ प्रमाणे गुन्हा दिनांक १०/०८/२०२३ रोजी दाखल असलेचे दिसून आले.
2) दिनांक १३/०८/२०२३ रोजी रात्रीचे सुमारास नगाववारी येथून चोरलेल्या सुपर स्प्लेंडर या दुचाकीवर ट्रीपल सिट बसुन गरताड गावचे शिवारातील तिखी फाटा येथे येवुन एका इसमास दुचाकीवरुन खालीपाडून त्याचेवर गावठी बनावटीचे पिस्तूल रोखुन त्यास शिवीगाळ व दमदाटी करून त्याचेकडून एक मोबाईल, एक होंडा कंपनीची युनिकॉर्न दुचाकी मोटार सायकल व रोख रक्कम असे जबरदस्तीने हिसकावलेले होते असे सांगितलेने मोहाडी नगर पोलीस ठाणे येथे संपर्क साधुन अभिलेख तपासणी केली असता त्याबाबत मोहाडी नगर पोलीस ठाणे येथे भाग ५ गुन्हा रजि नं २२७/२०२३ भादंवि कलम ३९२, ३४ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दिनांक १४/०८/२०२३ रोजी दाखल असलेचे दिसुन आले.
३) दिनांक १४/०८/२०१३ रोजी रात्रीचे सुमारास तिखी फाटा येथुन चोरलेल्या युनिकॉर्न मोटार साकलचा वापर करून साक्री रोड हायवे वरील मोराणे गावचे बस स्टॉप जवळ एक पुरुष व एक महीला यांना गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांचे डोळयात मिरचीची पावडर फेकुन त्यांचे जवळील दोन मोबाईल, सोन्याचे मंगळसूत्र असलेली काळया मन्यांची पोत व रोख रक्कम असे बळजबरीने हिसकावून चोरी करून पळून गेलेलो होतो. असे सांगितलेने धुळे तालुका पोलीस ठाणे येथे संपर्क साधुन अभिलेख तपासणी केली असता त्याबाबत धुळे तालुका पोलीस ठाणे येथे भाग ५ गुन्हा रजि नं ४७३/२०२३ भादंवि कलम ३९२, ५०६, ३४ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दिनांक १५/०८/२०१३ रोजी दाखल असलेचे दिसुन आले. नमुद आरोपीत यांचेकडुन पश्चिम देवपर पोलीस ठाणे, धुळे तालुका पोलीस ठाणे व मोहाडी नगर पोलीस ठाणे येथे दाखल असलेले तीन जबरी चोरीचे गुन्हे उपडकीस आलेले असुन त्यांचेकडुन
१) आझाद नगर पोलीस स्टेशन कडील दाखल गुन्हयातील मिळून आलेला गावठी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत काडतुस, तिन मोबाईल, व एक्टीवा मोटार सायकल असा एकुण १,०६,०००/-रुपयेचा
२) पश्चिम देवपुर पोस्टे येथे दाखल गुन्हयातील एक सुपर स्प्लेंडर दुचाकी वाहन क्रमांक एम एच १८ ए एच ०५०३ एक ओप्पो कंपनीचा मोबाईल असा एकूण ३७,०००/- रु रकमेचा
३) मोहाडी उपनगर पोस्टे. येथे दाखल गुन्हयातील एक होड़ा कंपनीची युनिकॉर्न दुचाकी मोटार सायकल वाहन क्रमांक एम एच ०६ ए व्ही ७९९३ व एक रिअल मी कंपनीचा मोबाईल असा एकुण ७७,०००/- रु रकमेचा मुद्देमाल व
४) धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हयातील दोन मोबाईल व सोन्याचे मंगळसूत्र असलेली काळया मन्यांची पोत मधील दोन वाटया असा एकूण २४,५००/- रु रकमेचा असा एकुण २,४४,५००/- रुपये रकमेचा मुददेमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
गुन्ह्यातील आरोपींना दि. १६/०८/२०२३ रोजी मा. न्यायालयासमोर हजर केले असता मा. न्यायालयाने दि. १८/०८/२०१३ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिलेली आहे. सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक संजय बारकुंड सो, मा अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे सो, व मा. सहायक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश रेड्डी सो. तसेच पोनि. नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. संदीप पाटील, सहा. फौज. प्रकाश माळी, पोहवा./ योगेश शिरसाठ, पोहवा. / मुक्तार मन्सुरी पोना./ गौतम सपकाळे, पोना./संदीप कढरे, पोना./योगेश शिंदे, पो कॉ./अनिल शिपी, पोकॉ. / अझरोददीन शेख, पो.कॉ. /सचिन जगताप, पोकॉ./पंकज जोंधळे, चालक/ हरिष गोरे यांनी केलेली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
2:16 pm, January 13, 2025
temperature icon 27°C
साफ आकाश
Humidity 33 %
Wind 11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!