DPT NEWS NETWORK 🗞️✍️
साक्री:- दिनांक 30/8/2023 रोजी कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीची बैठक मा. श्री. हर्षवर्धन दहिते, सभापती जि.प. धुळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी सुरवातीला पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने तिथीनुसार कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येत असल्यामुळे त्यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. तसेच कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचा व तांत्रीक कामांचा तालुकानिहाय आढावा घेण्यात आला. सद्यास्थितीत जिल्हयात लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव वाढला असल्याकारणाने विभागाने शंभर टक्के लसीकरण करावे, बाधीत पशुधनावर उपचार व प्रतिबंधक उपाययोजनेत गोचिड निर्मूलन करुन रोगाचा जास्त प्रसार होणार नाही याची दक्षता घ्यावी, जिल्हयात दुष्काळ सदृष्य परिस्थीती निर्माण झाली असल्याकारणाने पशुधनासाठी वैरण बियाणे पुरविणे, पशुपालकांना मुरघास पुरविणे बाबत नियोजन करुन जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठवावा, जिल्हयात दुध भेसळीचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी संबंधीत डेअरींवर जाऊन दुधाचे नमुने तपासणी नियमित करणे बाबत दहिते यांनी संबधीत अधिकाऱ्यांना सूचीत केले.
मौजे वासखेडी, जैताणे येथील उपकेंद्र यांचे कामे निधी अभावी रखडले असल्यामुळे कृषी पंपांना विजकनेक्शनची अडचण निर्माण होत असल्याचे संबंधीत अधिकाऱ्याने सांगीतले, आगामी रब्बी हंगामासाठी आवश्यक व पुरेशा प्रमाणात रब्बी ज्वारी व हरभरा बियाणेचा पुरवठा करणे, चारा पिकासाठी सुधारीत जातीचे बियाणे पुरवठा करणेचे नियोजन करणे, जिल्हयात अपु-या पावसामुळे उद्भवलेल्या दुष्काळ सदृष्य परिस्थिती अनुषंगाने करावयाच्या उपाय योजना तसेच पिकविमा बाबतचा आढावा तालुका निहाय घेण्यात आला. पीक विमा कंपनीने पीकविमा देणेसाठी ठरविलेले निकष असमाधानाकारक असल्याने सदर निकषामध्ये बदल करणे बाबत वरीष्ठस्तरावर पाठपुरावा करणे, राज्य शासनाच्या कृषी विभागाकडुन जिल्हयातील ज्या-ज्या शेतक-यांनी पिकविमा काढला आहे. अश्या सर्व विमाधारक शेतक-यांना सद्याच्या अपु-या पावसामुळे उद्भवलेल्या दुष्काळ सदृष्य परीस्थीतीमुळे जास्तीत-जास्त शेतक-यांना पिक विमाचा लाभ देण्यासाठी विशेष प्रयत्न करणेच्या सुचना यावेळी दहिते यांनी दिल्यात. सद्यस्थितीत प्रकल्पनिहाय उपलब्घ पाण्याची टक्केवारी काढतांना गाळयुक्त परीस्थीतीचा विचार करुन लघु व मध्यम प्रकल्पात उपलब्ध पाणी साठयाची आकडेवारीत सुधारणा करावी, जिल्हयात अपु-या पावसामुळे उदभवलेल्या दुष्काळ सदृष्य परीस्थीतीवर मात करणेसाठी शेतक-यांना मदत करणेसाठी जि.प. सेसफंडातून योजना राबविणे आवश्यकता असल्याने त्यासाठी योजनेचा प्रारुप आराखडा सादर करावा. तसेच दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सतर्क राहून शेतकऱ्यांच्या हितासाठी कटीबध्द राहावे अशा सुचना श्री.दहिते यांनी केल्या. यावेळी शिंदखेडा पं.स. सभापती सौ. वंदना ईशी, जि.प. सदस्या सौ.भैरवी शिरसाठ, जिल्हा पशुसंर्धन अधिकारी डॉ. राजेंद्र लंघे, पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. आर.एम. शिंदे, सहा. आयुक्त डॉ. ए.टी. वाडीले, कृषी विकास अधिकारी श्रीम. कावेरी राजपूत, मोहिम अधिकारी पी.व्ही. निकम यांच्यासह कृषी, पशुसंवर्धन विभागासह चारही तालुक्याचे कृषी अधिकारी, पशुधन विकास अधिकारी, विद्युत, पाटबंधारे, लीडबँक, डीडीसीसी बँक, महाबिज, दुग्धव्यवसाय विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.