DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी- सुहासकुमार काकडे
नांदेड : शासनाने गोवंश प्राणी हत्या बंदी कायदा लागू असताना त्याचे उल्लंघन करत गोवंशाचे मांस, हाडे, कातडी व इतर अवशेष टेंपो द्वारे नांदेड ते सोनखेड मार्गे बीड कडे वाहतूक करत असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाल्याने सोनखेड पोलिसांनी सापळा रचून गोमास वाहतूक करणारा टेंपो अडवून तपासणी केली असता त्यात गोमास आढळून आल्याने सदरील टेंपो ताब्यात घेवून सोनखेड पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला.
नांदेड येथून बीडकडे गोवंशाचे मांस, कातडी, हाडे, शिंगे व इतर अवशेष घेऊन जाणारा टेंपो क्र. एम एच ०४ बी यु ६४०८ या वाहनाद्वारे वाहतूक होत असल्याची माहिती मनसेचे योगेश्वर मोरे व विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे पदाधिकारी धैर्यशील बावणे यांनी सोनखेड पोलिसांना कळवली असता पोलिसांनी सोनखेड येथे सदरील टेंपो अडवून त्याची तपासणी केली असता त्यात गोवंशाचे मास व इतर अवशेष आढळून आल्याने सदरील टेंपो सह ३ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेवून आरोपी सय्यद मुजम्मिल सय्यद खलील रा. नेकनुर जि. बीड व सलीम पठाण रा. नांदेड या दोघां विरुद्ध सोनखेड पोलिसात स.पो.नि. दिलीप चिते यांच्या फिर्यादिवरुन महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पो. उप. नि. चंदनसिंह परिहार हे करीत आहेत.