नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

बोरीवलीत , मित्राचा आईशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, मित्राची चालत्या मालगाडीसमोर ढकलून हत्या


मुंबई : आपल्या आईशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून मित्राने मित्राची मालगाडीसमोर ढकलून हत्या  केल्याची घटना बोरीवलीत घडली आहे. आरोपीने आधी मयत तरुणाला रेल्वे ट्रॅकजवळ नेऊन मारहाण केली त्यानंतर समोरुन येणाऱ्या मालगाडीसमोर ढकलले. यात पीडित तरुणाचा मृत्यू झाला. गणेश नरसिंग मुखिया (22) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी बोरीवली जीआरपी पोलिसांनी आरोपीला काही तासांतच अटक केली आहे. अशोक मुखिया असे आरोपीचे नाव आहे. मयत गणेश मुखिया हा मूळचा रहिवासी असून महिनाभरापूर्वीच मुंबईत कामधंदा करण्यासाठी आला होता. मात्र संशयातून मित्रानेच त्याचा घात केला. याप्रकरणी बोरीवली जीआरपी पोलीस कारवाई करीत आहेत.

मयताच्या शरीरावर जखमा दिसल्याने पोलिसांना संशय आला
बोरिवली जीआरपी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री बोरीवली ते कांदिवली दरम्यान पोईसर रेल्वे ट्रॅकवर पोलिसांना एक मृतदेह आढळून आला होता. मयत तरुणाच्या शरीरावर काही जखमा होत्या. या जखमांच्या खुणा पाहून पोलिसांनी ही हत्या असल्याचा संशय आला. पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला असता, मयत हा बोरिवली ते कांदिवली दरम्यानच्या रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टी भागातील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याच्यासोबत राहणाऱ्या मित्राला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता मयत तरुणाची ओळख पटली.

आईसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून मित्राची हत्या
गणेश महिनाभरापूर्वीच मुंबईत आला होता आणि आपल्या घरी राहून फ्रँकीचा व्यवसाय करायचा, अशी माहिती आरोपीने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. गणेश हा आरोपी अशोकच्या आईसोबत वारंवार फोनवर बोलत असे. यामुळे गणेश आणि आपल्या आईमध्ये अनैतिक संबंध सुरु आहेत, असा संशय अशोकला होता. याच संशयातून त्याने गणेश काटा काढायचा ठरवले. त्याप्रमाणे गुरुवारी तो गणेशला रेल्वे ट्रॅकजवळ घेऊन गेला. तिथे नेऊन त्याला मारहाण केली. त्यानंतर त्याला मालगाडीसमोर ढकलून दिले, असे आरोपीने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करुन पुढील कारवाई सुरु केली. 

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

Dhule
4:04 am, January 13, 2025
temperature icon 19°C
साफ आकाश
Humidity 59 %
Wind 8 Km/h
Wind Gust: 7 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!