नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद काळात नंदुरबार जिल्हा ‘अलर्ट’ मोडवर! आक्षेपार्ह पोस्टवर सायबरची करडी नजर….

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या विरोधात कठोर कारवाईचे आदेश…

DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी :- प्रविण चव्हाण

नंदुरबार -: जिल्यातील सायबर पोलिस यावर लक्ष ठेवून असल्याचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले.

पी.आर. पाटील
पोलीस अधीक्षक, नंदुरबार


आगामी काळ हा सणासुदीचा आहे. गौरी- गणपती, गणेशोत्सव, ईद ए मिलाद असा हिंदू-मुस्लिम बांधवांचा उत्सव आहे.
या काळात शांतता-सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सर्व समाजातील बांधवांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह चित्र अथवा पोस्ट टाकू नये, यावर सायबर पोलिस यंत्रणा करडी नजर ठेवून आहे. अशा कृती आढळून आल्यास थेट कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
दिनांक 19 ते 28 सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सव सण साजरा करण्यात येणार आहे. तसेच दिनांक 29 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद हा सण साजरा करण्यात येणार आहे.
सण उत्सव काळात समाजातील काही विकृत व गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक मुद्दाम व्हॉट्सऍ़प, इंस्टाग्राम, ट्वीटर, फेसबुक इत्यादी सोशल मीडीयाच्या माध्यमातून खोट्या बातम्या किंवा अफवा पसरवून नागरिकांमध्ये भितीचे व दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतात. त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी खबरदारी म्हणुन जिल्हा पोलीस दलातील सोशल मीडिया सेल सक्रिय केलेला आहे.
सण उत्सवा दरम्यान शांतता भंग करणारे तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणारे काही समाज कंटकांकडून अनुचीत प्रकार होणार नाहीत. तसेच फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सऍ़प, ट्विटर व इतर सोशल मीडियावर तेढ निर्माण करणाऱ्या व खोट्या बातम्या प्रसारित करणारे व्हिडीओ, किंवा पोस्ट प्रसारित करणाऱ्यांविरुध्द् नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील सायबर सेल मार्फत सोशल मीडियावर 24 तास विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.
तसेच काही अनूचीत प्रकार आढळून आल्यास त्यांचेविरुध्द् कठोर कायेदशीर कारवाई करण्यात येईल, असे नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी यावेळी सांगितले. सोशल मीडियाचा वापर करमणूक व ज्ञान मिळविण्यासाठी केला जात असतो. परंतु सोशल मीडियावरुन काही लोक सार्वजनिक शांतता भंग होईल अशा आक्षेपार्ह पोस्ट, लेख लिहुन खोडसाळपणा करतात. म्हणून सोशल मीडिया व इंटरनेटच्या माध्यमातून पोस्ट करतांना सामाजीक भान ठेवावे व कोणतीही पोस्ट सोशल मीडियावरुन (फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सऍ़प) प्रसारित करतांना ती पोस्ट आक्षेपार्ह आहे अगर कसे ? याबाबत खात्री करुन मगच ती प्रसारित करण्याची काळजी घ्यावी.
आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करणाऱ्या इसमांविरुध्द् भारतीय दंड संहीता व माहीती तंत्रज्ञान अधिनियम प्रमाणे कठोर कारवाई करण्यात येईल असे, पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील तसेच सायबर सेल नंदुरबार यांचेकडून वृत्तपत्र व सोशल मीडियाद्वारे वारंवार नागरिकांना आवाहन करण्यात येत असते.
सोशल मीडियावर ठेवलेले आक्षेपार्ह स्टेटस किंवा मजकूर प्रसारित करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करुन कठोर कारवाई करण्याचे आदेश, पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिले होते.
नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरिकांना इशारा देण्यात येतोे की, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सऍ़प, ट्विटर किंवा इतर सोशल मीडियावर आक्षेपार्ह, सार्वजनिक शांतता भंग करणारे व खोट्या बातम्या प्रसारित करणारे व्हिडीओ, किंवा पोस्ट प्रसारित करु नये किंवा त्याबाबत सोशल मीडियावर स्टेटस ठेवू नये. तसेच कोणीही कायदा हातात घेवून सार्वजनिक शांतता भंग करु नये, तसे आढळून आल्यास संबंधीतांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येतील, तसेच त्याची गय केली जाणार नाही, असा इशारा नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी दिला आहे. तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवून प्रसारित करण्याचे दिसून आल्यास तात्काळ नियंत्रण कक्ष किंवा नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधवा.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
2:56 pm, January 13, 2025
temperature icon 27°C
साफ आकाश
Humidity 33 %
Wind 11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!