DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- उमेश महाजन
एरंडोल: जालन्यात मराठा समाज आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे, विजेचे लोडशेडींग बंद करावे, तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा आदी मागण्यांसाठी सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता येथे हायवे चौफुलीवर जवळपास वीस मिनिटे रास्ता रोको करण्यात आला.
यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या.यावेळी महामार्गाच्या दुतर्फा थांबलेल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रास्ता रोको नंतर घोषणा देत तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. तहसीलदार सुचिता चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात शिवसेना ऊबाठा गटाचे जिल्हा प्रमुख डॉ. हर्षल माने,काँग्रेस चे तालुकाध्यक्ष विजय महाजन, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नाना भाऊ महाजन, माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन,गजानन महाजन,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले,शिवसेना उबाठा गटाचे तालुकाध्यक्ष रवी चौधरी,रमेश महाजन, राजेन्द्र शिंदे, अभिजित पाटील,डॉ.सुरेश पाटील,जगदीश पाटील, डॉ.प्रशांत पाटील, गजानन पाटील, कुणाल महाजन, शिवाजीराव अहिरराव,रविंद्र पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मराठा क्रांती मोर्चा तर्फे निवेदन देण्यात आले.
आंदोलनकर्त्यांवर अमानुष मारहाण केल्याप्रकरणी एस. पी. व पोलिसांना बडतर्फ करावे तसेच राज्याचे गृहमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी निवेदाद्वारे करण्यात आली आहे.
याप्रसंगी एरंडोल पोलिस निरीक्षक सतीश गोराडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.