DPT NEWS NETWORK 🗞️✍️
खेळाडूंसाठी मदतीस नेहमी तयार : दिपक जमादार
कलमसरे येथील उद्यान पंडित बापूसाहेब ग .द . माळी गुरुजी शिक्षण प्रसारक संस्थेच्या आदर्श माध्यमिक विद्यालयात शासकीय जिल्हास्तरीय बेसबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.
धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व धुळे जिल्हा बेसबॉल संघटना व आदर्श माध्यमिक विद्यालय कळमसरे यांच्या संयुक्त विद्यमाने शिरपूर तालुक्याचे प्रथम आमदार उद्यान पंडित बापूसाहेब ग .द .माळी गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय शासकीय बेसबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून थाळनेरचे उपसरपंच व उद्योजक मा. श्री. दीपक भाऊ जमादार, मांडळचे माजी सरपंच व उद्योजक, वि. का. सोसायटीचे मांडळचे चेअरमन मा .श्री. गौरव मोहन सोनवणे, शिरपूर तालुका क्रीडा अधिकारी मा .श्री. एम. के. पाटील साहेब, शिरपूर शिवसेना तालुकाप्रमुख मा.श्री. कन्हैया चौधरी महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचे सदस्य, श्री. मनोज भाऊ धनगर, मराठा पाटील बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष, मा. श्री. रावसाहेब चव्हाण, धुळे जिल्हा बेसबॉल संघटनेचे सचिव मा .श्री. कैलास कंखरे, मुख्याध्यापक मा. श्री. वाय. व्ही. पाटील, बेसबॉल संघटनेचे सदस्य ,श्री.राजेश मोरे, श्री. रोहित धनगर ओम धनगर, धुळे जिल्हा संघटनेचे सचिव श्री. मयूर बोरसे एम. आर. पी. मुकेश भाई पटेल मिलिटरी स्कूलच्या क्रीडा शिक्षिका डॉ. जोत्सना जाधव आदी उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी मुकेश भाई पटेल मिलिटरी स्कूल, आदर्श माध्यमिक विद्यालय, कळमसरे साहेबराव सोमा पाटील माध्यमिक विद्यालय व जुनिअर कॉलेज, तऱ्हाडी हस्ती पब्लिक स्कूल, दोंडाईचा व कानोसा कॉन्व्हेट, मनपा धुळे चे संघ उपस्थित होते. प्रमुख अतिथींच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी खेळाडूंना शिरपूर तालुक्याचे प्रथम आमदार व करवंद धरणाचे जनक उद्यान पंडित बापूसाहेब ग. द. माळी गुरुजी यांच्या जीवन कार्याविषयी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक अशोक महाजन, सर यांनी सविस्तर माहिती दिली.
विद्यालयाकडून मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी मा. दीपक भाऊ जमादार यांनी खेळाडूंना लागेल ती मदत करण्यास मी सदैव तयार आहे असे आश्वासित केले. त्यांनीही बेसबॉल खेळाचा आनंद प्रत्यक्ष खेळून घेतला. त्यानंतर सर्व मान्यवरांनीही बेसबॉल खेळाची माहीती घेऊन व स्वतःही प्रात्यक्षिके केली. यावेळी धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कडून खेळांच्या वेळापत्रकाच्या वार्षिक पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये 14 वर्षे वयाखालील मुलांच्या संघात मुकेश भाई पटेल मिलिटरी स्कूलचा संघ विजयी झाला. तर हस्ती पब्लिक स्कूलचा संघ उपविजयी झाला. सतरा वर्ष वयाखालील मुलांच्या संघात मुकेश भाई मिलिटरी स्कूल तांडेचा संघ विजयी झाला. तर हस्ती पब्लिक स्कूल, दोंडाईचा हा संघ उपविजयी झाला. 14 वर्षे वयाखालील मुलींच्या संघात मुकेश भाई पटेल मिलिटरी स्कूल विजय झाला. सतरा वर्ष वयाखालील मुलांच्या संघात आदर्श माध्यमिक विद्यालय कळमसरे चा संघ विजयी झाला. तर साहेबराव सोमा पाटील माध्यमिक विद्यालय व जुनिअर कॉलेज तऱ्हाडीचा संघ उपविजेता झाला . सतरा वर्ष वया खालील मुलींच्या संघामध्ये आदर्श माध्यमिक विद्यालय कळमसरेचा संघ विजयी झाला. एकोणावीस वर्ष वयाखालील संघामध्ये मुलांच्या संघांमध्ये मुकेश भाई पटेल मिलिटरी स्कूल तांडेचा संघ विजयी झाला. मुलींच्या 19 वर्षाखालील गटात मुकेश भाई पटेल मिलिटरी स्कूल तांडेचा संघ विजयी झाला. विजयी झालेल्या संघांची विभाग स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. सर्व विजयी संघांचे मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी तलवारबाजीचा आंतरराष्ट्रीय खेळाडू, जयेश राजपूत याची खेळाडू गटातून तलाठी पदावर नियुक्ती झाली. म्हणून मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्काराचे आयोजन करण्यात आलेले होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन, विद्यालयाचे क्रीडाशिक्षक श्री. अशोक महाजन यांनी केले. तर आभार प्रदर्शन बेसबॉल संघटनेचे जिल्हा सचिव, श्री. कैलास कंखरे यांनी केले . स्पर्धेसाठी पंच म्हणून श्री. राजेश मोरे, श्री. रोहित धनगर, ओम धनगर यांनी काम पाहिले स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.