DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा
साक्री : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील शेवाळी (दा.) येथील नामवंत ज्येष्ठ भजनी कलाकार, लोक कलावंत व वारकरी संप्रदायातील एक निस्सीम विठ्ठल भक्त आदरनीय अशोक भगवान उर्फ अशोक तात्या यांनी जि.प. धुळे आयोजित जिल्हा लोक कलावंत स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला त्याबद्दल जि.प. धुळे तर्फे त्यांचा यथोचित सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या आनंदाप्रीत्यर्थ शेवाळी येथील लोककलावंत स्व. कॉम्रेड श्रावण जिभाऊ यांचे मुंबईस्थित सुपुत्र प्रा. प्रकाश सोनवणे यांनी माऊली अशोक तात्या यांचा त्यांच्या घरी जाऊन सन्मान केला. तसेच त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांचे तोंडभरून कौतुक केले. या सत्कार प्रसंगी प्रा. प्रकाश सोनवणे यांच्या तामसवाडी व राईनपाडा येथील माध्यमिक शाळेतील शिक्षकवृंद उपस्थित होते.