DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- संदीप सकट चंदगड
कोल्हापूर :- कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड हे गाव भौगोलिकदृष्टा विस्तीर्ण व डोंगराळ भागात असल्याने याचा गैरफायदा घेत काही मंडळी गैरमार्गाने गोवा बनावटी दारू विक्रीचा व्यवसाय करत असल्याचे दिसून येत आहे. गोवा बनावटी ची सहा लाखाची दारू नुकतीच चंदगड पोलिसांनी जप्त केली आहे.
वाघोत्रे (चंदगड) या गावाच्या हद्दीत विना परवाना पिकअप गाडीतून गोवा बनावटी मद्याची वाहतूक करणाऱ्या महेंद्र खरवत (वय २०) रा खडासे, ता. दोडामार्ग जि. सिंधुदुर्ग याच्यविरुद्ध चंदगड पोलिसांकडून कारवाई करुन गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
चंदगड परिसरात अवैध गोवा बनावटी दारू वाहतूक होत असल्याबद्दलची गुप्त माहिती मिळताच कोल्हापूर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चंदगड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष घोळवे व त्यांच्या पोलीस टीमने धाडसी कारवाई करत सूत्रधार महेश खरवत याला मद्याच्या गाडी सह वाघोत्रे परिसरात रंगेहाथ पकडले. त्यात सहा लाखाची विविध कंपनी असलेल्या गोवा बनावटी दारू, सीलबंद लाकडी बॉक्स मधील गॅसअनायलयझर १८ लाख ८० हजार रु असे एकूण वाहनासह ३५ लाख २८ हजार ५८ रू चे मुद्देमाल जप्त करण्यात आला. वरील धाडसी कारवाई बाबत चंदगड तालुक्यातून पोलीस वर्गाचे कौतुक होत आहे.