DPT NEWS NETWORK 🗞️✍️
साक्री प्रतिनिधी – अकिल शहा
धुळे : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील शेवाळी (दातर्ती) ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सुरेखा दत्तात्रय साळुंखे यांची मंगळवारी बिनविरोध निवड करण्यात आली.सुरेखा साळुंखे यांची बिनविरोध निवड जाहीर होताच त्यांचा सत्कार करुन आनंद साजरा केला.
शेवाळी गावाच्या नवनिर्वाचित सरपंच सुरेखा साळुंखे या माजी साक्री पंचायत समितीचे सभापती तथा माजी सरपंच नितीन साळुंखे यांच्या काकू आहेत.
शेवाळी (दा.)ग्राम पंचायतीच्या मावळत्या सरपंच चित्राताई प्रदिप नांद्रे यांनी दिनांक २४/०८/२०२३ रोजी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी २६ सप्टेंबर २०२३ मंगळवार रोजी फेरसरपंच पदाची निवडणूक दिनांक २६/०९/२०२ रोजी मंडळ अधिकारी शेवाळी तथा अध्याक्षी अधिकारी गजानन दगडू सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली ग्राम पंचायत शेवाळी कार्यालयात पार पडली , शेवाळी ग्रामपंचायतीचे सरपंच पद महिला प्रवंर्गासाठी राखीव असल्याने सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी सहभाग घेण्यात येणार असल्याबाबत दिनांक १८/०९/२०२३ रोजी तलाठींच्या वतीने सर्व अकरा ग्रामपंचायत सदस्यांना लेखी नोटीसद्वारे कळविण्यात आले होते. त्यानुसार शेवाळी ग्रामपंचायतीचे सर्व ११ सदस्य हजर होते.
यावेळी सरपंच पदासाठी सुरेखा दत्तात्रय साळुंखे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने मंडळ अधिकारी शेवाळी तथा अध्याक्षी अधिकारी गजानन दगडू सोनवणे यांनी सुरेखा दत्तात्रय साळुंखे यांची बिनविरोध निवड जाहीर केली. यावेळी ग्रामपंचायत शेवाळी चे ग्राम विकास अधिकारी एम.जी. सोनवणे, आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्राम सुधार मंडळाचे चेअरमन, सचिव, सदस्य, विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन व संचालक मंडळ, सामाजिक कार्यकर्ते, जिल्हा परिषद केंद्र शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षीका, गावकरी आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरपंच पदी निवड जाहीर झाल्या नंतर गावकऱ्यांनतर्फे सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
गावकऱ्यांनी आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया यावेळी नवनिर्वाचित सरपंच सुरेखा साळुंखे यांनी दिली आहे.