DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी :- अकिल शहा
साक्री: धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील धमणार येथे वन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या आदेशानुसार वनविभाग धुळे अंतर्गत वनपरिक्षेत्र पिंपळनेर विभाग मार्फत विधायक युवा संघटना संचलित तात्यासाहेब वसंत सोनू खैरनार माध्यमिक विद्यालयात वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. याप्रसंगी वनविभागाचे म्हसदी येथील वनपाल डी. जी. पगारे वनरक्षक धनवाळ, वन कर्मचारी रमेश बच्छाव, वसंत खैरनार, बेडसे आदी उपस्थित होते, याप्रसंगी विद्यार्थ्यांसमोर वन्यजीव व त्यांचे रक्षण व त्यांच्यापासून मानव व समाजाचे रक्षण होणे कामी करण्यात येणाऱ्या उपाय आणि काळजी घेण्याबाबतचे आवाहन करण्यात आले तसेच बिबट्याकडून होणारे हल्ले टाळण्यासाठी व त्यांचे रक्षण करण्यासाठी समाजाने पुढे आले पाहिजे, जंगल संपत्ती वाढविण्यासाठी व वन्य पशुंच्या रक्षणासाठी नागरिकांनी घ्यावयाच्या काळजीबाबत देखील माहिती देण्यात आली.
याप्रसंगी वेळ वन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या अकरा कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांचे वाचन करण्यात आले याप्रसंगी विद्यालय परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक लतीफ मंसूरी, सहशिक्षक जितेंद्र खैरनार, अविनाश खैरनार, लक्ष्मीकांत सोनवणे, रेखा जाधव, रूपाली मगरे, धनश्री काकुळते, दीपक कटके, कल्पेश भामरे, पंकज बदाने, दिलीप अहिरे, पी. बी गायकवाड, जी. डी. खैरनार, अनिल वाघ, राहुल भामरे, किरण वाघ आदींनी परिश्रम घेतले.