DPT NEWS NETWORK 🗞️✍️
धुळे : धुळे शहराची व्याप्ती पश्चिम दिशेला वाढत आहे. वलवाडी या भागातच जास्त प्रमाणात नागरी वस्ती देखील वाढली आहे आणि वाढत आहे. नवनवीन कॉलन्या तयार होत आहेत. म्हणून या परिसरातून महानगरपालिकेला टॅक्स देखील मोठ्या प्रमाणात मिळत आहे. वलवाडी भाग गेल्या महानगरपालिके च्या निवडणुकीपासून धुळे महापालिकेशी जोडला गेलेला भाग आहे.
परंतु हा भाग अद्यापही धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातच आहे. परंतु या भागाकडे कोणाचेही अद्याप लक्ष नाही. अजूनही त्यापरिसरातील नागरिक सुविधांपासून वंचित आहेत. वलवाडी भागातील सर्व कॉलनी रहिवाशांनी कॉलनी परिसरातील रस्ते, गटारी, पथदिवे यांच्या समस्या आज देखील वलवाडी ग्रामपालिका होती, त्या वेळेपासून तश्याच आहेत. अशा अनेक समस्यांना घेऊन धुळे लोकसभेचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांना निवेदन दिले. यावेळी डॉ. सुभाष भामरे यांनी वलवाडी भागाचा विकास करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करू असे आश्वासन देखील दिले.