गुन्हे शाखा युनिट 1 ने केला खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा दोन आरोपी केले गजाआड
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी :- मनोहर गोरगल्ले
पुणे : महाळुंगे पोलीस ठाणे हद्दीतील कुरुळी परिसरातून सचिन हरिराम यादव वय 19 वर्षे राहणार पुणे नाशिक रोड उरुळी तालुका खेड जिल्हा पुणे हा दिनांक २४/ ८/२०२३ रोजी घरातून कामा निमित्त बाहेर गेला व परत आला नाही. त्याचा सर्वत्र शोध घेतला पण मिळून न आल्याने वडील हरिराम यादव यांनी दिनांक २८/ ८/२०२३ रोजी महाळुंगे पोलीस ठाणे मनुष्य मिसिंग क्रमांक १३३/ २०२३तक्रार दाखल केली.
एक तरुण मुलगा घरात कोणाला काही न सांगता अचानक गायब झाल्याने माननीय पोलीस आयुक्त विजयकुमार चौबे साहेब, पोलीस उपायुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे मॅडम यांनी सदर प्रकरणाचा समांतर तपास करण्यासाठी गुन्हे शाखा युनिटी १चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांना आदेश दिले त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक इब्राहम शेख, पोलीस हवालदार फारुख मुल्ला, पोलीस हवालदार प्रमोद हिरवळकर, पोलीस हवालदार अमित खानविलकर, पोलिस हवालदार सचिन मोरे, पोलीस शिपाई विशाल भोईर, पोलीस शिपाई प्रमोद गर्जे,पोलीस शिपाई स्वप्निल महाले, पोलीस शिपाई नितेश बिच्छेवार, असे पथक नेमून सदर प्रकरणाचा तपास सुरू केला. तपास करत असताना पथकाने सदर मिसिंग मुलाने त्या दिवसभरात त्याने भेटी दिलेल्या प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या ठिकाणावरील माहिती संकलन केली. तसेच त्या त्या ठिकाणावरील सीसीटीव्ही फुटेज मिळविले तसेच सर्व तांत्रिक माहिती संकलित केली. सदर माहितीचे विश्लेषण करून मिसिंग मुलगा एमआयडीसी खेड परिसरात दोन अनोळखी इसमांन बरोबर असल्याचे दिसून आले. त्यातील एक इसम हा रोहित नागवसे हा मिसिंग मुलाचे चाळीत भाड्याने राहत असल्याची माहिती मिळाली. परंतु दोन दिवसापासून तो सुद्धा गायब असल्याची माहिती मिळाली.
सदर बाबत पोलीस हवादार फारूक मुल्ला यांना त्या दिवशी मिसिंग मुला सोबत असलेला दुसराही इसम केज जिल्हा बीड येथे असल्या बाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक इम्रान शेख यांचे नेतृत्वात पथकाने त्या ठिकाणी जाऊन त्या इसमास ओळखून विचारपूस केली असता त्याचे नाव गोरख जनार्दन फल्ले वय 32 वर्ष राहणार कानडी रोड केज जिल्हा बीड असल्याचे माहित झाले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्या दिवशी पुण्यात त्याचे मामेभाऊ रोहित नागवसे यांच्या सोबत मिसिंग मुलासोबत निमगाव परिसरात देवदर्शनासाठी जाऊन त्या परिसरातील जंगलात मिसिंग मुलास दारू पाजून त्याच्या डोक्यात दगडाने मारहाण करून त्याचा खून केल्याची माहिती दिली. व त्याने रोहित नागवसे यास किन्नर/ तृतीयपंथी बनण्यासाठी एका किन्नर कडे पाठवले असल्याचे सांगितले. व तो वसई विरार परिसरात असल्याची माहिती प्राप्त केली व तेथील घरात किन्नर कडे चौकशी केली असता तिने तिचे नाव गायत्री असे सांगितले सदर बाबत संशय आल्याने अधिक सखोल चौकशी केली असता सदर किन्नर ही पाहिजे असलेला रोहित नागवसे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी व स्वतःचे अस्तित्व लपवण्यासाठी रोहित नागवसे हा गुन्हा घडल्यापासून ठाणे मुंबई परिसरात किन्नरच्या वेषात राहून पोलिसांची दिशाभूल करीत होता. रोहित व गोरख दोघे ही कर्ज बाजारी झाल्याने पैशांसाठी यादव कुटुंबीयास लुटण्याचा कट त्यांनी केला होता. त्याप्रमाणे दिनांक २४/८/२०२३ रोजी सचिन यादव यास एम आय डी सी खेड परिसरातील जंगलात येऊन दारू पाजून त्याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचे सांगितले.
सदर महाळुंगे पोलीस ठाणे मनुष्य मिसिंग क्रमांक १३३/२०२३ मधील मिसिंग मुलगा सचिन हरिराम यादव वय १९ वर्ष राहणार पुणे नाशिक रोड कुरुळी तालुका खेड जिल्हा पुणे याचा खून झाल्याचे निष्पन्न झाल्याने सदर दोन्ही आरोपी १) गोरख जनार्दन फल्ले वय ३२ वर्षे राहणार कानडी रोड केज, जिल्हा बीड, २) रोहित शिवाजी नागवसे वय 22 वर्ष राहणार जवळबंद, तालुका केज जिल्हा बीड यांना पुढील कारवाईकामी महाळुंगे पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त विजयकुमार चौबे, पोलीस आयुक्त संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) सतीश माने, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस उपनिरीक्षक इम्रान शेख, सहाय्यक पोलीस फौजदार शिवाजी कानडे, पोलीस हवलदार फारुख मुल्ला, पोलीस हवलदार प्रमोद हिरवळकर, पोलीस हवलदार अमित खानविलकर, पोलीस हवलदार सचिन मोरे, पोलीस हवलदार उमाकांत सरोदे, पोलीस हवलदार बाळू कोकाटे, पोलीस हवलदार महादेव जावळे, पोलीस हवलदार सोमनाथ बोर्हाडे, पोलीस हवालदार मनोज कमले, पोलीस शिपाई विशाल भोईर, पोलीस शिपाई प्रमोद गरजे ,पोलीस शिपाई स्वप्निल महाले, पोलीस शिपाई अजित रुपनवर, पोलीस शिपाई मारुती जायभाये, पोलीस शिपाई तानाजी पानसरे, पोलीस हवलदार नागेश माळी,(टि ए डब्ल्यु) पोलीस शिपाई नितेश बिच्छेवार (सायबर क्राईम) यांनी सदरची कारवाईचा तपास पूर्ण केला.