DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकील शहा
साक्री : साक्री उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे यांच्या नेतृत्वात अवैध गावठी दारू बनवणाऱ्या हातभट्ट्यांवर एकाच दिवशी तीन ठिकाणी रेड टाकून सहा गावठी दारूच्या भट्ट्या व रसायने असे एकूण दोन लाख 55 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट करून धडक कारवाई करण्यात आली.
धुळे जिल्ह्यातील साक्री पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुप्त बातमीदाराच्या माहितीद्वारे अशी माहिती मिळाली की, मालनगाव शिवारात कान नदीच्या परिसरात गावठी दारू मोठ्या प्रमाणात गाळली जात आहे त्या माहितीच्या आधारे साक्री विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे यांच्या नेतृत्वात दि. १९/०९/२०२३ रोजी दुपारी ०३:३० वाजेपासून ते सायंकाळी ०६ वाजेच्या दरम्यान एकूण तीन पथके तयार करून सहा ठिकाणी रेड टाकण्यात आल्या या सहाही ठिकाणी गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायने लाकडी बांबूने बनवलेले, पत्री टाक्या, प्लास्टिकचे निळ्या रंगाचे ड्रम व रसायने भरलेले एकुण ७० निळ्या रंगाचे ड्रम असे अंदाजे दोन लाख 55 हजार रुपये किमतीचे रसायने व साहित्य जागीच नष्ट करण्यात आली या अनुषंगाने साक्री पोलीस स्टेशन येथे मुंबई प्रोव्ही का. क.६५(ई),(फ),(ब),(क) प्रमाणे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदरची कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली साक्री विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे यांच्या नेतृत्वात पोसई आय. एच. काझी, असई अशोक पाटील, पोलीस कॉन्स्टेबल खंडू सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल पोरोळकर, पोलीस कॉन्स्टेबल प्रणव सोनवणे व साक्री आरसीपी मधील पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय सैंदाणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल जितेंद्र पाटील, पोलीस कॉन्स्टेबल पांचाळ, पोलीस कॉन्स्टेबल गरदरे व इतर आरसीपी मधील पोलीस अमंलदार या सर्वांनी यशस्वी रेड टाकून उल्लेखनीय कारवाई केली आहे. या कारवायांमुळे परिसरातील गावठी दारू बनवणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.