DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी: बाळासाहेब सोनवणे
नाशिक :- नाशिक जिल्हा मध्य. सहकारी बँक सध्या विविध अडचणींमधून मार्गक्रमण करीत आहेत. शेतकऱ्यांना सुरळीत कर्ज पुरवठा सुरु होणे, ठेवीदारांना ठेवी देणे, कर्ज वसुली, बँकेची खालवलेली पत सुधारणेकरिता बँक पूर्वपदावर आणणे गरजेचे आहेत. याकरिता सिन्नरचा लोकप्रतिनिधी म्हणून मी व निफाडचे आमदार दिलीप काका बनकर आम्ही दोघांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना नाशिक जिल्हा मध्य. सह.बँक हि बँक महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि., मुंबई या बँकेस चालविण्यास देणे कामी सर्व संबंधितांसह बैठक लावणेबाबत पत्र दिले होते. त्याअनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अध्यक्षतेखाली बैठक पार पडलेली आहेत. या बैठकीस सहकार मंत्री ना.दिलीपराव वळसे पाटील, महाराष्ट्र राज्य विधानमंडळाचे उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवाळ, आदिवासी विकास मंत्री ना.श्री. विजयकुमार गावित, आ. दिलीप काका बनकर, आ. नितीन पवार, वित्त विभाग व सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव, नियोजन विभागाचे प्रधान सचिव, नाबार्डचे अधिकारी, शिखर बॅंकचे प्रशासक श्री. विद्याधर अनासकर, सहकार उपसचिव श्री. संतोष पाटील, विभागीय सहनिबंधक श्री. विलास गावडे, NDCC बँकेचे प्रशासक व इतर अधिकारी आदी या बैठकीस उपस्थित होते. सदर बैठकीत झालेले निर्णय खालीलप्रमाणे
– महाराष्ट्र राज्य सह. बँक प्रशासक म्हणून काही वर्षासाठी NDCC बँकेवर काम करेल.
– त्यासाठी संयुक्त समिती गठीत करण्यात आलेली आहेत. त्यात महाराष्ट्र राज्य सह. बँकचे प्रशासक श्री.विद्याधर अनासकर, सहकार आयुक्त श्री. अनिल कवडे, सहकार विभागाचे उपसचिव संतोष पाटील व बँकेचे प्रशासक श्री. प्रतापसिह चव्हाण हे असतील.
– बँकेचे Due Diligence करून घेणार. यात बँकेची आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करून तसा अहवाल तयार करून शासनास सादर केला जाईल.
– त्यानुसार राज्य शासन, केंद्र शासन, नाबार्ड व RBI यांच्या परवानगीने पुढील निर्णय घेतला जाईल.
बँकेला काही वर्षात पूर्व पदावर आणणे. हा एकमेव उद्देश समोर ठेवून सदर निर्णय घेण्यात येणार आहे.