DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- संदिप सकट
कोल्हापूर: चंदगड आणि दोडामार्ग याला जोडणारा सुवर्णमध्य मार्ग म्हणून ओळख असणारा तिलारी घाट अत्यंत अवघड व अरुंद म्हणून ओळखला जातो. या घाटातून चंदगड व बेळगाव सीमा भागातील अनेक चाकरमानी, शिक्षक, व्यावसायिक आपला दैनंदिन प्रवास राज्य परिवहन महामंडळाच्या बस मधून तसेच खाजगी गाड्यातून ये जा करत असतात.
तर काही मंडळी पाटणे फाटा ते दोडामार्ग या प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी अवजड वाहनांची वाहतूक देखील या मार्गाने करत असल्याचे आढळून आले आहे. अवजड वाहनांना या घाटातून वापर करण्यास बंदी असूनही काही मंडळी जीवघेणी कसरत करुन सर्वसामान्यांचा दैंनदिन जीवनात अडचणी आणून त्यांना नाहक त्रास त्या अवजड वाहनांचा त्रास राज्य परिवहन महामंडळाला जास्त प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे.

याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व वाहतूक पोलीस यांचे साफ दुर्लक्ष असल्याचे आढळून आले आहे. या घाटातून अवजड वाहनांची वाहतूक दैनंदिन होत असून त्यावर तातडीने बंदी आणणे गरजेचे आहे. सदर तिलारी घाटातून गोवा बनावटी मद्याची वाहतूक करणाऱ्या टोळीकडून अलिकडेच चंदगड पोलिसांनी गोवा बनावटी दारू जप्त केली होती. त्यामुळे या घाटमार्गावर कायमस्वरूपी पोलीस चौकी सुरू करावी अशी मागणी प्रवाशी वर्ग व चंदगडवाशिया कडून व्यक्त होत आहे.



