DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी – राहुलआगळे
नंदुरबार: सांगलीत दोन तर हिंजवडीत एका तरुणांचा डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजामुळे नुकताच मृत्यू झाला. असा हा जीवघेणा आवाज नंदुरबारात मात्र बंद झालाय. डीजे डाॅल्बीचा कानठळ्या बसवणारा आवाज.. त्यावर थिरकणारी तरुणाई हे चित्र आता नंदुरबार जिल्ह्य़ातून हद्दपार झालय. हा बदल सहजासहजी झालेला नाही. गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवापासून नंदुरबार पोलिसांनी यासाठी प्रचंड कष्ट घेतले. शेकड्यांनी बैठका घेतल्या. यादरम्यान या अवघड मोहिमेचे कॅप्टन एसपी पी.आर.पाटील यांचेकडे सवलतीसाठी राजकीय नेत्यांमार्फत विनंत्या आणि दबावाचे प्रयत्नही झाले परंतु उपयोग झाला नाही.नंदुरबारचे नागरिक तर विविध सामाजिक उपक्रमामुळे पोलीसांच्या कामावर फिदा आहेत मग तसा विरोध उरलाच नाही उलट प्रचंड पाठींबा मिळाला.आता कोणत्याही कार्यक्रमात इथे डाॅल्बी वाजत नाही.
गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही डाॅल्बी धारकांनी आपल्या डाॅल्बीच्या चाव्या वाहनासह पोलीसांकडे सपूर्त केल्या. कल्पक एसपी पी.आर.पाटील यांनी या सर्व डाॅल्बीधारकांचा मंत्र्यांच्या हस्ते सत्कार केला आणि त्यांचेसाठी पर्यायी रोजगारासाठी मार्गदर्शन मेळावाही घेतला.जिल्ह्यातील गणेश मंडळांचा गेल्या वर्षीच्या डाॅल्बीमुक्त धोरणाबद्दल सत्कार केला.त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात डाॅल्बी डीजे तर लांबची गोष्ट, कोणी साधे स्पीकर अथवा कर्णेही लावले नाहीत. सर्वत्र फक्त ढोल ताशांचाच आवाज होता. पारंपरिक वाद्य वादकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळाला.
राज ठाकरे यांनीही हा विषय आता उचलला आहे.गेल्या काही वर्षांपासून मोठ्या आवाजावर सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध घातले आहेत मात्र ते सर्वत्र धाब्यावर बसवले जातात.नंदुरबार जिल्हा मात्र याला अपवाद आहे. नंदुरबारचे पोलीस अधीक्षक या शांततेचं श्रेय इथल्या शांतताप्रिय नागरिकांना आणि आपल्या सर्व सहका-यांना देतात.
हा आगळावेगळा विधायक इतिहास घडविण्यासाठी नंदुरबारच्या पोलीस अधीक्षकांसह अपर अधीक्षक निलेश तांबे,उपअधीक्षक सदाशिव वाघमारे,संजय महाजन, दत्ता पवार, पो.निरीक्षक रविंद्र कळमकर,किरण खेडकर,निलेश गायकवाड,अजय वसावे,राहुल पवार, ज्ञानेश्वर वारे,इशामुद्दीन पठाण,दीपक बुधवंत,शिवाजी बुधवंत,संदीप पाटील तसेच सपोनि प्रकाश वानखेडे,राजन मोरे, राजेश गावित यांनी अहोरात्र परिश्रम घेतले.