DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी अकिल शहा
साक्री : मजदूर अधिकार मंच महाराष्ट्र व इतर सामाजिक संघटना महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांसोबत काम करीत आहे, त्याचाच एक भाग म्हणून मजूर अधिकार मंच महाराष्ट्र ही संघटना धुळे व नंदुरबार या जिल्ह्यात काम करीत आहे. ऊसतोड मजुरांचा दर हा तीन वर्षाला ठरवला जातो तो यावर्षी ठरवला जाणार आहे गुजरात राज्यात हा दर प्रति टन ४७६ रुपये सरकार द्वारा निश्चित केला गेला आहे मग आपल्या राज्यात सुद्धा महागाईच्या प्रमाणात ऊसतोड प्रति टन ५०० रुपये देण्यात यावा व इतर मागण्यां संदर्भात दिनांक ०९ ऑक्टोबर २०२३ सोमवारी रोजी तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी संघटनेतर्फे ऊसतोड मजुरांची नोंदणी कारखान्यांनी करावी, कामगारांना माथाडी कायदा लागू करावा, अन्याय, अत्याचार याची दखल तात्काळ घ्यावी व त्वरित मदत करावी, ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी होस्टेलची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी या धरणे आंदोलनात करण्यात आली आहे. या वेळी धुळे जिल्ह्यातील ऊसतोड कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.