DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – अशोक पाटील
धुळे – खाजगी पंटर रितेश अरुण पवार यांनी शिंदखेडा तहसिल कार्यालयातील नायब तहसिलदार व इतर अधिकारी, कर्मचारी यांच्या नावाने तक्रारदार यांच्याकडे तडजोडीअंती 14 हजार रुपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडले.
तक्रारदार हे मौजे डांगुर्ण (ता. शिंदखेडा, जि. धुळे) येथील रहिवाशी असुन त्यांचे व त्यांचे कुटुंबातील इतर 3 सहधारकांच्या नावे मौजे डांगुर्ण येथे एकसामाईक शेतजमिन आहे. सदर शेतजमिनीची त्यांना खातेफोड करायची असल्याने तकारदार हे खातेफोड करण्याकरीताचा अर्ज व त्यासोबत आवश्यक कागदपत्र जोडुन तहसिल कार्यालय शिंदखेडा येथे गेले असता त्यांना तहसिल कार्यालयाचे जवळ पंटर रितेश पवार भेटले. त्यांनी तकारदार यांचेकडुन शेतजमिनीच्या खातेफोड बाबतची माहिती घेवुन त्यांना दिनांक 04 ऑक्टोबर 2023 रोजी तहसिल कार्यालयात बोलावुन घेतले. त्याप्रमाणे तक्रारदार व शेतजमिनीतील सहधारक तेथे गेलेे असता पंटर रितेश पवार यांनी त्यांना तहसिल कार्यालयात घेवुन जावुन तक्रारदार यांच्या खातेफोड प्रकरणाचे कामकाज करुन दिले. त्यानंतर पंटर रितेश पवार यांनी त्यांचे तहसिल कार्यालयातील नायब तहसिलदार व इतर अधिकारी, कर्मचारी यांच्याशी घनिष्ट संबंध आहेत, असे सांगुन तक्रारदार यांचेकडे त्यांचा खातेफोडचा आदेश काढुन देण्यासाठी नायब तहसिलदार व इतर अधिकारी, कर्मचारी यांना देण्यासाठी तक्रारदार यांचेकडे 20,000/- रुपये लाचेची मागणी केली असल्याची
तकार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,धुळे कार्यालयाकडे दिली होती. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीचे अनुषंगाने दिनांक 6 ऑक्टोबर 2023 रोजी तहसिल कार्यालय शिंदखेडा येथे जावुन पडताळणी केली असता पंटर रितेश पवार यांनी तक्रारदार यांचेकडे पंचांसमक्ष तडजोडीअंती 14,000/- रुपयांची लाचेची मागणी करुन आज दिनांक 10 ऑक्टोबर 2023 रोजी पंटर रितेश पवार यांनी तक्रारदार यांचेकडुन 14,000/- रुपये लाचस्विकारतांना रंगेहात पकडण्यात आले असुन त्याच्या विरुध्द भ्र. प्र. अधिनियम सन 9988 चे कलम 7 अ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, हेमंत बेंडाळे, रुपाली खांडवी तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, संतोष पावरा, प्रशांत बागुल, गायत्री पाटील, रामदास बारेला, प्रविण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली आहे. सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिंबधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावळकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व वाचक पोलीस अधीक्षक नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.