DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – रविंद्र गवळे
नंदुरबार – बामखेडा त.त.(ता.शहादा)येथील ग्राम विकास संस्थेच्या कला महाविद्यालयात कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव च्या वतीने सर्व विद्यापीठ परिक्षेत्रामध्ये चाललेल्या तणाव मुक्त व कॉपीमुक्त परीक्षा उपक्रमांतर्गत महाविद्यालयातील परीक्षा समन्वयक प्रा.एस. एस. दुथडे यांनी तणाव मुक्त व कॉपीमुक्त परीक्षा या संदर्भात उद्बोधन वर्ग घेतला. उद्बोवधन वर्गामध्ये महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. प्रा. दुथडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुद्धा मांडले आणि आपल्या उद्बोधनाला सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या उद्बोनामध्ये शिक्षणातील अनेक आव्हानांपैकी हल्ली परीक्षा प्रकारामध्ये होणाऱ्या कॉप्या हे मूळ आव्हान ठरत आहे.कॉपीचे प्रमाण हा कोविडच्या प्रभाव आहे असे म्हणून कॉपी या गैरप्रकाराच्या विरोधात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाच्या आढावा घेतला.कॉपी गैरप्रकार एक प्लेग आहे तो नष्ट केलाच पाहिजे. तो जर नष्ट झाला नाही तर राष्ट्रनिर्मिती हे दिवा स्वप्न होऊ शकेल असा सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या संदर्भ घेऊन उद्बोधन वर्गामध्ये विचार मांडले. प्रा. दुथडे यांनी कॉपीच्या संदर्भातील विद्यापीठाचा अध्यादेश क्रमांक नऊचा आढावा घेऊन त्यात कॉपी या गैरप्रकारचे निरनिराळे पैलू आणि त्यावर होणाऱ्या शिक्षा यावर सविस्तरपणे विचार मांडले. 15 प्रकारचे गैरप्रकार म्हणजेच कॉपीयुक्त वर्तन व प्रत्येक वर्तनाला अध्यादेशामध्ये असलेली शिक्षेची तरतूद यांचे विवेचन केले.परीक्षा ही परीक्षा असते त्यातून ताण निर्माण होऊ नये आणि म्हणून तणावमुक्त परीक्षा अत्यंत आवश्यक आहे असे मौलिक विचार प्रा. दुथडे यांनी मांडले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील होते. त्यांनी तणाव ही एक मानसिक स्थिती आहे. त्यात देवाचा अथवा नशिबाचा काहीही संबंध नाही असे म्हणून ताण तणावाचा अर्थ, तो कसा निर्माण होतो तसेच ताणांचे विविध प्रकार याचे सखोल विचार मांडून त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या ताणाचे स्वरूप कसे असू शकते व त्यावरील उपाय या संदर्भात मार्गदर्शन केले. आपल्या अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.एस. पी. पाटील यांनी ‘से नो टू कॉपी’या संदर्भातील विद्यापीठ परीक्षेतील प्रत्येक प्रवेश पत्रावर असणाऱ्या शिक्क्याचे वर्णन केले.या उदबोधन वर्गाचे सूत्रसंचलन प्रा. डॉ. सी. एस. करंके यांनी केले तर आभार प्रकटन प्रा. एम.एस. निकुंभे यांनी केले.शेवटी सर्वांनी कॉपी या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी संकल्प केला व कार्यक्रमाच्या समारोप झाला.