DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी – राहुलआगळे
पं. स. सदस्या सौ. चंदनबाई पानपाटिल यांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
शहादा तालुक्यातील खैरवे-भडगांव, देऊर, टेंभा, सारंगखेडा व अनरद या गावांतुन शेकडो मुले व मूली शिक्षणासाठी शहादा येथे ये-जा करतात परंतू बसेसची संख्या कमी आणि विद्यार्थी व प्रवाशी संख्या दररोज जास्त राहत असल्यामुळे चेंगरा-चेंगरी होते व त्यामुळे मूली व महिलांचा सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. बहुतेक वेळा जागेवरुन भांडणे देखील होतात. म्हणून हे टाळण्यासाठी शासन स्तरावरून मानव विकास योजनेतून महिला मुलींसाठी शहादा आगारास शहादा ते खैरवा (सारंगखेडा मार्गे) या मार्गावर सकाळी 9:00 वाजता, दुपारी 12:00 वाजता व संध्याकाळी 5:30 वाजता अशा तीन फेऱ्यांसाठी एक बस उपलब्ध करुण देण्यात यावी व शहादा आगार प्रमुखांनी दुपारी 12:30 वाजेची खैरवा बस सुट्टीच्या दिवशीही पूर्ववत सुरु ठेवावी अशी पंचायत समितीच्या मासिक सभेत वडाळी गणाच्या पंचायत समिति सदस्या सौ. चंदनबाई पानपाटिल सोबत कळंबु गणाच्या पंचायत समिति सदस्या बानुमतीताई ईशी व सुलवाडे गणाच्या पं.स. सदस्या रमणबाई पवार यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे मागणी केली.
सदर बस साठी लवकरात लवकर शासन स्तरावर माननीय नंदुरबार जिल्हाधिकारी सो, मा. जिल्हा परिषद नंदुरबार मुख्यकार्यकारी अधिकारी व माननीय तहसीलदार शहादा यांनी कार्यवाही करून राज्य परिवहन महामंडळाच्या शहादा आगारास बस उपलब्ध करुण सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली.