बालाजी मोबाईल शॉपी लोहा हे दुकान फोडुन चोरटयांनी चोरुन नेलेले मोबाईल पैकी एकुण 03 मोबाईल रु.65,000/- किंमतीचे हस्तगत करण्यात आले.
DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- काकडे सुहास कुमार
लोहा : दि. 05/04/2022 रोजी हनमंत बळवंत लांडगे यांचे लोहा शहरातील बालाजी मोबाईल शॉपी तसेच तुळशीराम रंगनाथ जोरुळे यांची साई मोबाईल गॅलरी तसेच आझीज गुलाम हुसैन कुरेशी यांची अनुपकुमार मोबाईल शॉपी ईत्यादी दुकाने चोरटयांनी पहाटे 04 ते 05 वा.सु.शटर उचाकाडुन तिन अनोळखी चोरांनी मोबाईल व 10 ब्लुटुथ व 75,000/- नगदी असा एकुण 10,03,117/- रु.चा. मुद्देमाल चोरांनी चोरुन नेला होता. त्यावरुन पोलीस स्टेशन लोहा येथे गुरनं 76 / 2022 कलम 457,380,34 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हयातील निष्पन्न दोन आरोपी व मोबाईल चे शोध कामी लोहा पोलीसांची टीमने उत्तर प्रदेश राज्यातील किठोर ता मवाना जि. मेरठ या ठिकाणी तसेच मसुरी जि. गाजियाबाद येथे जाऊन तांत्रीक विश्लेषनाचे आधारे आरोपीचे पत्यावर शोध घेतला असता नमुद गुन्हयातील 03 विवो कंपनीचे एकुण 65,000/- रु. किंमतीचे मोबाईल एका आरोपीचे घरातुन घरझडती मध्ये हस्तगत केले आहेत व यातील निष्पन्न आरोपीतांचा शोध पोलीसांमार्फत चालु आहे.. सदरची कामगीरी मा. पोलीस अधिक्षक नांदेड श्री. श्रीकृष्ण कोकाटे साहेब,
मा. अप्पर पोलीस अधिक्षक नांदेड श्री. अविनाश कुमार साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कंधार श्री. मारोती थोरात साहेब, मा. पोलीस निरीक्षक पोस्टे लोहा श्री ओमकांत चिंचोलकर साहेब – यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि मंगेश नाईक, पोहेका नारायण कदम यांनी केली आहे. तांत्रीक माहीती पुरवणे कामी सायबर सेल नांदेड चे पोउपनि दळवी, पोहेका राजेंद्र सिटीकर, पोहेका दिपक ओढणे यांनी मदत केली.