नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

साक्री तालुक्यात दोन गटात तुफान हाणामारी

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- हेमंत महाले


साक्री : साक्रि तालुक्यातील भामेर शिवारातील श्री म्हसाई माता मंदिरात सुरू असलेल्या नवरात्रौत्सवाच्या ठिकाणी वाद होवून काल दोन गटात तुफान दंगल उसळली. यात अनेक जण जखमी झाले आहेत. ऐन दसऱ्याच्या तोंडावर वाद उफाळून आल्याने निजामपूर-जैताणे परिसरात तणावाचे
वातावरण निर्माण झाले आहे.
याप्रकरणी सुरक्षारक्षक सुरेश शामू मोरे याने पोलिसांना दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे
की, भामेर परिसरातील श्री म्हसाई माता मंदिराच्या आवारात नवरात्रौत्सव सुरू आहे.
त्याठिकाणी काल रात्री ८ वाजेच्या सुमारास जैताणे गावातील दिनेश धनगर हा रस्त्यात पाय टाकून उभा होता. त्यामुळे गरबा खेळणाऱ्या महिलांना त्रास होत होता. याबद्दल जाब
विचारल्याने दिनेश धनगरने वाद घातला. काही वेळाने तेथे वाद निवळला. यानंतर सुरेश मोरे
व त्याचा चुलत भाऊ श्रावण मोरे या दोघांना जमावाने रात्री ९ वा. निजामपूरच्या इंडियन
ऑईल पंपाजवळ अडवून बेदम मारहाण केली. जमावाने सुरेश मोरे याच्या दुचाकीचीही
तोडफोड केली. यासह जातीवाचक शिवीगाळ आणि जीवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केला.
यावरून पोलिसांनी दिनेश धनगर, दशरथ शेलार, पिनू उर्फ बाजीराव पगारे, विठोबा धनगर, सचिन धनगर, बादल धनगर, बापू धनगर, नितीन धनगर, संभा भलकारे, राहूल किरण, मास धनगर, युवराज धनगर, गोकुळ धनगर, भुरा पेंढारे, देवा काटके यांच्यासह ४० ते ५० जणांविरूद्ध भादंवि कलम ३०७, १४३, १४७, १४८, १४९, ३४१, ४२७ सह अ.जा.ज.क. नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
तर दुसऱ्या गटातील दिनेश भलकारे (व्यवसाय वायरमन) यांनी म्हटले आहे की,
नवरात्रौत्सवानिमित्त भामेर गावातील म्हसाई माता मंदिर परिसरात यात्रा भरली आहे.
दि.२३ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे म्हसाई माता मंदिरात
दर्शनासाठी गेलो होतो. तेव्हा तेथील सुरक्षा रक्षक सुरेश शामराव मोरे, रा. इंदिरानगर,
भिलाटी, निजामपूर याचा पाय आडवा आल्याने त्यास माझा पाय लागला. त्यावर चुकून माझा पाय लागला असे म्हटले आणि गरबा नृत्य बघण्यासाठी तेथे गेलो. काही वेळाने
सुरेश मोरे हा रविंद्र मोरे, किरण मोरे, भरत भिल, लक्ष्मीकांत शाह, दुल्लभ जाधव,
बजरंग भिल, राजेश माळचे, शंकर भिल, धर्मा भिल, अर्जुन भिल, श्रावण भिल, भारमल
पोलीस वेळेवर पोहोचल्याने अनर्थ टळला!
पोलीस वेळेवर पोहोचले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. रात्री आदिवासी समाजाने
रात्री दोघा गटांमध्ये तुफान दगडफेक आणि हाणामारीचा प्रकार घडत असताना
निजामपूर पोलीस ठाणे गाठून न्याय मिळण्याची मागणी केली. त्यानुसार मध्यरात्री
त्यांची फिर्याद नोंदवून ४० ते ५० जणांवर गुन्हा दाखल झाला. काही संशयितांची
धरपकड रात्रीच पोलिसांनी केली. तर आज सकाळी धनगर समाजही पोलीस ठाण्यात
जमला होता. त्यांनीही आपली बाजू मांडून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून गावात तणावपूर्ण शांतता आहे.
भिल, दीपक भिल, आकाश मोरे, भिमा भिल, प्रभु भिल, सर्व रा. जैताणे, निजामपूर
यांच्यासोबत माझ्याजवळ आला. त्याने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने डोक्यावर वार
केला. वार चुकविताना डावा हात आडवा केला असता हातावर जबर मार बसला. त्यानंतर
रविंद्र मोरे, किरण मोरे, भरत भिल, लक्ष्मीकांत शाह, दुल्लभ जाधव, बजरंग भिल, राजेश
माळचे, शंकर भिल, धर्मा भिल, अर्जुन भिल, श्रावण भिल, भारमल भिल, दीपक भिल,
आकाश मोरे, भिमा भिल, प्रभु भिल तसेच इतर ३० ते ४० जणांनी लाठ्या-काठ्यांनी तसेच हाताबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत किरण मोरे याने खिशातील पाच हजारांची रोकड बळजबरीने काढून घेतली. तर बजरंग भिल याने गळ्यातील पाच ग्रॅम वजनाचे
सोन्याचे ओमपान हिसकावून घेतले. यावेळी नितीन पगारे, विक्की पेंढारे, पंकज पगारे,
संदीप भलकारे आदींनी बचाव केला. तेव्हा संदीप भलकारे यांना देखील जमावाने मारहाण
केली. या फिर्यादीवरून निजामपूर पोलीस ठाण्यात सुरेश मोरे, रविंद्र मोरे, किरण मोरे,
भरत भिल, लक्ष्मीकांत शाह, दुल्लभ जाधव, बजरंग भिल, राजेश माळचे, शंकर भिल, धर्मा
भिल, अर्जुन भिल, श्रावण भिल, भारमल भिल, दीपक भिल, आकाश मोरे, भिमा भिल,
प्रभु भिल, सर्व रा. जैताणे, निजामपूर यांचेसह ३० ते ४० अज्ञात इसमांवर भादंवि कलम
३९५, १४३, १४७, १४८, १४९,३२४ आदी कलमांन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली
आहे. पुढील तपास निजामपूर पोलीस करीत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
12:24 pm, January 13, 2025
temperature icon 25°C
साफ आकाश
Humidity 36 %
Wind 10 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!