नात्याला काळीमा फासणारी घटना
आरोपी विरूद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल
DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- सुहास काकडे
लोहा : लोहा तालुक्यातील माळाकोळी पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या बेलवाडी येथे ३४ वर्षीय मुलाने जन्मदात्या मातेचा कत्तीने वार करुन खुन केल्याची घटना घडली असुन, माळाकोळी पोलिसांने आरोपी मुलास ताब्यात घेवून गुन्हा नोंद केला आहे.
लोहा तालुक्यातील माळाकोळी पोलीस स्टेशनअंतर्गत असलेल्या बेलवाडी येथील इंजिनिअर असलेल्या नृसिंह बालाजी केंद्रे वय ३४ या तरुणाने माणुसकीला काळींमा फासत ५० वर्षीय आई गंगाबाई बालाजी केंद्रे यांच्यावर मध्यरात्री २.३० वाजताच्या सुमारास झोपेत असताना गळ्यावर व डोक्यात कत्तीने वार करुन खुन केल्याची घटना घडली असुन, आरोपीचे वडील शिक्षकी पेशा असलेले बालाजी एकनाथ केंद्रे वय वर्षे ५४ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन माळाकोळी पोलिसात (गु.र.न. १६१/२३ कलम ३०२ आयपीसी) सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंद करुन आरोपीस ताब्यात घेतले आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मारोती थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली माळाकोळी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय निलपत्रेवार करत आहेत. लोहा तालुक्यातील माळाकोळी नजिक असलेल्या बेलवाडी येथील बालाजी एकनाथ केंद्रे यांचे दोन मुले असुन एक मुलगा डॉक्टर तर दुसरा आरोपी इंजीनियरिंग झालेला तर मुलगी ही डॉक्टर असून परिसरात शैक्षणिक, सामाजिक दृष्ट्या सधन कुटूंब असलेल्या बालाजी केंद्रे यांच्या कुटूंबात अशी माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेमूळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.