DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- बाळासाहेब सोनवणे
संगमनेर : महाराष्ट्रात लाचलुचपत प्रतिबंध विभाग जोमाने काम करत असताना देखील सरकारी अधिकाऱ्यांवर त्यांचा धाक बसत नाही असेच चित्र संगमनेर येथील घटनेवरून जवळपास पाहायला मिळत आहे. त्यातच फटाक्याचा स्टॉल लावण्यासाठी परवाना देताना ८०० रुपयांची लाच मागणाऱ्या संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब यादव यास नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ अटक केली..
दिवाळी काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे फटाक्याचा स्टॉल लावण्यासाठी व्यापाऱ्यांची लगबग सुरू आहे. स्टॉल लावण्यासाठी पोलीसांची परवानगी घ्यावी लागते. त्यानंतर तहसिलदार कार्यालय आणि कलेक्टर ऑफिसमधून परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे स्टॉल लावण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी तक्रारदार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गेला होता. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब यादव याने त्याच्याकडे पैशांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने अहमदनगर येथील लातूर प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला व याप्रकरणी तक्रार केली. त्यानुसार अहमदनगर येथील लाचलुच प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक प्रवीणकुमार लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम संगमनेर शहर पोलीस ठाण्यात सुरू होते.