DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- मनोहर गोरगल्ले
पुणे :- गुजरातहून पुण्याकडे गुटखाची तस्करी करणाऱ्या ट्रक चालकास आळेफाटा पोलीसांनी ट्रकसह आरोपीस ताब्यात घेतले.त्याच्याकडून २९,५४,००८/- रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
दि ३१/१०/२०२३ रोजी पोलीसांना गोपनिय बातमी मिळाली की, गाडी कमांक जी जे 03 AT 3510 यामधून बेकायदेशीर गुटखाची वाहतुक होणार असून सदर ट्रक हा गुजरातहून पुण्याकडे जाणार आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने, त्याअनुषंघाने फाऊंटन हॉटेल समोर पोलीस उपनिरीक्षक रागिनी कराळे, पो.कॉ माळुजे,अरगडे, ढोबळे, आमले या पोलीस पथकाने नाकाबंदी करीत असताना, एक अशोक लेलंड कंपनीचा ट्रक कमांक जी जे 03 AT 3510 हा संशयीत रित्या मिळून आल्याने सदर ट्रक चालकास त्याचे नाव व पत्ता विचारून त्याच्याकडे चौकशी केली असता तो उडवाउडवीचे उत्तरे देवू लागल्याने सदरचा ट्रक चेक केला असता, त्यामध्ये विनापरवानाचे कायदेशीर रित्या १) विमल कंपनीची सुगंधित सुपारीची २० खाकी पोते२) निळया कलरचे एकुण ०४ पोते त्यामध्ये तंबाखु, असा एकुण ०९,५४,००८/- रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने सदर बाबत सह आयुक्त (अन्न) अन्न व औषध प्रशासन महा राज्य स्पाईन रोड, मोशी, पुणे यांना कळवून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अल्ताफ नरमहम्मद शेख वय ४३ वर्षे व्यवसाय चालक रा. मोती बाजार, गोंदल ता. गोंदल जि. राजकोट, राज्य गुजरात याच्याविरूध्द अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याच्याकडून ट्रकसह एकुण २९,५४,००८/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिली.
पोलीस अधिक्षक अंकीत गोयल अपर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर, पोलीस उपनिरीक्षक रागिनी कराळे पोलीस हवालदार विनोद गायकवाड, आव्हाड, अमित माळुजे, नवीन अरगडे, हनुमंत ढोबळे, आमले यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर हे करीत आहेत.