गावातून 16 वर्षात 1900 रक्ताच्या बॅगांचे संकलन
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – रविंद्र गवळे
नंदुरबार: बामखेडा त.त.ता. शहादा येथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त एकता पंधरावडाचे औचित्य साधून ग्रामस्थ व नवजीवन ब्लड बँक, धुळे यांचे संयुक्त विध्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. एकूण 102 जणांनी रक्तदान केले त्यात 11 महिला व 91 पुरुषांनी सहभाग नोंदविला.
सरदार वल्लभभाई पटेल यांची 31 ऑक्टोबर रोजी जयंती चे औचित्य साधून सामाजिक कर्तव्य म्हणून 15 ऑक्टोबर पासून “एकता पंधरवडा” या अभियानांतर्गत नंदुरबार जिल्ह्यात लेवा पाटीदार गुजर समाजाच्या वतीने विविध गावांमध्ये रक्तदान शिबीर तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. याचेच औचित्य साधून बामखेडा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले,कार्यक्रम प्रारंभ वेळी सरदार वल्लभ पटेल यांच्या प्रतिमेला जिल्हा सत्र न्यायालयाचे सरकारी विधिज्ञ अँड. विनोद गोसावी यांचे हस्ते फुलाहर अर्पण करून व दिप प्रज्वलन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली.यावेळी महिला,पुरुष, तरुण मित्र मंडळ यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शिबीर उदघाटन प्रसंगी अँड.विनोद गोसावी यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितलं कि, बामखेडा गावात गेल्या 16 वर्षांपासून रक्तदानाचे महान कार्य सुरु असून यामुळे हजारो रुग्णना जीवनदान मिळालेले आहे.श्रीमद भागवत रुपी धार्मिक कार्यापासून प्रारंभ झालेले समाजकार्य आज एक मोठे जीवनकार्य बनलेले आहे, झालेला म्हणून माणसाने जिवंतपणीचं रक्तदानचे पुण्य कर्म करावे आणि आपण हे पुण्यकर्म हजारो वेळी करू शकतो व मानवता जपू शकतो.
विविध संघटना आणि व्यक्तींच्या सहभाग
ग्रामपंचायतचे सरपंच मनोज चौधरी, पोलीस पाटील योगेश चौधरी, उद्योजक किरण पटेल (पुणे), प्रवीणकुमार पटेल, चंद्रकांत पटेल, पत्रकार रवींद्र गवळे, हितेश पटेल, सुहास चौधरी, देवेंद्र पटेल, रविंद्र पटेल, तुकाराम पटेल, राजेंद्र पुराणिक, श्रीकांत पटेल, उमाकांत पटेल, पुरुषोत्तम पटेल, अमोल पटेल, जीवन पटेल, नरेंद्र पटेल, रविंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वते करिता रोशन पटेल, हर्षल पटेल, मुकुंद पटेल भुषण पटेल सागर पटेल राहूल पटेल,रोहित पटेल प्रशांत पटेल जयेश चौधरी आदित्य पटेल, महेश चौधरी, ऋत्विक पाटील, मयूर चौधरी,विजय पटेल,कुशल पुराणिक, उमेश पाटील,निखील पटेल आदी तरुण तसेच नवजीवन ब्लड बँकेचे संचालक डॉ.सुनील चौधरी, रोहिदास जाधव, गजानन चौधरी, कैलास पटेल, चंद्रकांत दंडगव्हाण, पांडुरंग गवळी यांचे सहकार्य लाभले.