DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी :- रविंद्र गवळे
नंदुरबार :- जिल्ह्यात गेल्या पाच वर्षापासून पोलीस पाटील पदभरती करण्यात आली नाही.आणि महिन्यापूर्वी पदभरती कार्यक्रम जाहीर करण्यात आले.परंतु,काही दिवसातच पुन्हा पदभरतीला स्थगित देण्यात आली. त्यामुळे युवकांचे पोलीस पाटील होण्याचे स्वप्न भंग झाले.जिल्ह्यात काही मोजकी गावे सोडलीतर जिल्ह्यात १०० टक्के आदिवासी गावे आहेत. पदभरती करण्यास काहीही अडचण नाही. तात्काळ पदभरती राबवावी. अगोदरच गेल्या पाच वर्षापासून शेकडो गावात पोलीस पाटीलविना कामकाज सुरु आहे.आणि काढलेली पदभरतीही लगेच स्थगित दिली.पोलिस पाटील हा महसूल व पोलिस यांच्यातील महत्त्वाचा दुवा असतो. गाव पातळीवरील घटना, घडामोडी, तंटे,वाद गावातच सोडविण्याची कामे केली जातात. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस पाटील यांची भूमिका महत्त्वाची असते. स्थगित केलेली पोलीस पाटील पदभरती त्वरित राबविण्याची मागणी बिरसा फायटर्सने सहायक जिल्हाधिकारी तळोदा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर बिरसा फायटर्सचे राज्य महासचिव राजेंद्र पाडवी, विभागीय प्रवक्ता दयानंद चव्हाण, जिल्हाध्यक्ष भरत पावरा, बिटीएसचे देविसिंग वळवी, अक्कलकुवा तालुकाध्यक्ष मानसिंग पाडवी, तळोदा उपाध्यक्ष प्रदीप पटले, रोझवा पुनर्वसन शाखाध्यक्ष बारक्या पावरा, गंगानगर शाखाध्यक्ष सायसिंग पाडवी, जगदीश वळवी, दिवान वळवी, कृष्णा पावरा, मेंढवड शाखाध्यक्ष रजनिश वसावे, उपाध्यक्ष अरुण वसावे, किरण वळवी, अनिल पावरा आदी. सह्या आहेत.