महाराष्ट्र व मध्य प्रदेश पोलीसांच्या खाकीला सलाम !!
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकील शहा
धुळे :- साक्री तालुक्यातील दरोड्यात घरातुन तरुण मुलीला अपहरण केल्याची भयानक घटना घडली. सविस्तर वृत्त असे की, काल साक्री शहर येथील अत्यंत रुहदय हेलावून टाकणारी घटना घडली शेवाळे यांच्या राहत्या घरी चोरांनी धाडसी चोरी केली त्या चोरीत एका 23 वर्षे युवती चे अपहरण करून सोबत काही रोकड व दागिने यांची यांची देखील चोरी करण्यात आली. सकाळी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी हे आपल्या सर्व टीमला घेऊन घटनास्थळी दाखल झाले व तपासाची चक्रे गतीने फिरवली, तसेच धुळे येथील नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे साहेब यांनीही घटनेची दखल घेत सर्व तपास यंत्रणेला कामाला लावले. त्यानंतर 24 तासाच्या आत म्हणजेच सदर तरुणीला पोलिसांना मध्यप्रदेश येथील सेंधवा येथे आढळून आली त्यानंतर साक्री पोलीस स्टेशनची एक टीम त्या तरुणीला घेण्यासाठी मध्य प्रदेशातील सेंधवा येथे पाठवण्यात आली व त्या मुलीला आपल्या घरी सुरक्षित पोहोचवण्यात पोलिसांना यश आले.
साक्री पोलीस स्टेशन चे सर्व कर्मचारी आणि धुळे पोलीस दलाच्या गुप्तचर यंत्रनेने देखील मनापासून कार्य केले त्यामुळे या कार्यात यश आले.
मात्र चोरांचा तपास अजून पोलीस यंत्रणेमार्फत सुरू आहे लवकरच पोलीस यंत्रणेला या चोरांना पकडण्यात देखील यश येईल असे साक्री तालुक्यातील जनमानसात बोलले जात आहे या सदर घटनेमधून सर्वांनी दक्ष राहणे गरजेचे आहे कुठल्याही संशयास्पद हालचालीवर लक्ष ठेवणे जागरूक नागरिकांचे देखील काम आहे पोलीस यंत्रणेला देखील नागरिकांनी सहकार्य करावे असे पोलीस विभागाकडून नेहमी आवाहन करण्यात येते.