नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

बापरे.. मंदिराचे कुलूप तोडून पळविले तेरा
लाखांचे दागिने…

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी :- संतोष जाधव

बारामती : बारामती तालुक्यातील मोरगाव मुटी लगत मोढवे येथील मरीमाता देवस्थान मधून सुमारे 13 लाख 30 हजार रुपये किंमतीच्या चांदीच्या ऐवज चोरी झाली असल्याची घटना घडलीआहे.

आज (दि. 21) रोजी दीड ते अडीच वाजण्याच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्तींनी देवीच्या मुख्य गाभाऱ्यात जाऊन ही चोरी केली
असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये निदर्शनास आले आहे. या जबरी चोरीमुळे परीसरात खळबळ उडाली आहे. बारामती तालुक्यातील मोढवे येथील मरीमाता देवी ही नवसाला पावणाऱ्या देवीपैकी मानली जाते. हे तीर्थक्षेत्र अष्टविनायक तिर्थक्षेत्र मोरगाव पासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर आहे. या
देवस्थानचे व्यवस्थापक सिताराम भाऊ जाधव यांनी करंजे पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. यानुसार आज (दि 21 ) रोजी
मध्यरात्री 01:30 वा. ते 02:30 वा. दरम्यान मोढवे गावातील ग्रामदैवत मरीमाता मंदीरामधील ११ लाख ९० हजार रूपये किंमतीचे ग्रामदैवत मरीमाता मंदीरामधील
चांदीचे मखरचे पार्ट अंदाजे १७ किलो वजनाचे, तसेच १ लाख ४०हजार रुपये किंमतीचे ग्रामदैवत मरीमाता मंदीरामधील चांदीचा टोप
अंदाजे वजन २ किलो वजनाचे असा एकूण १३ लाख ३० हजार रुपये किंमतीच्या मुद्देमालाची चोरी झाला आहे. बारामती तालुक्यातील मोढवे गावातील ग्रामदैवत मरीमाता मंदीरामधील अंदाजे १९ किलो वजनाचे चांदीची चोरी झाली असल्याने भावीकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सी.सी.टी. व्ही फुटेज पाहणीवरुन देवीचे मखरचे पार्ट व देवीचा चांदीचा टोप चोरणारे दोन अज्ञात इसमांनी मंदीराचे दोन कुलपे तोडून
मंदीरामधील मुळ गाभा-यात प्रवेश करुन 13,30,000 /- रुपये किंमतीचे चांदीची घरफोडी चोरी केलेली असल्याचे निदर्शनास आले आहे. हा सर्व घटनाक्रम सी. सी. टी. व्ही
फुटेजमध्ये कैद झाला आहे. चोरी करणाऱ्या दोन अनोळखी चोरटयांचे विरुध्द कायदेशिर फिर्याद करंजेपुल दुरक्षेत्र खबर नंबर 259/2023 अन्वये आलेने सदरचा गुन्हा
रजिस्टरला दाखल केला आहे. या घटनेचा
अधिक तपास पोसई सोनवलकर हे करीत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:17 am, January 13, 2025
temperature icon 24°C
साफ आकाश
Humidity 39 %
Wind 7 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!