आदिवासी विभागात कल्याणकारी योजनांमध्ये झालेल्या भ्रष्टाचारा विरोधात सामाजिक कार्यकर्ते गुलाब पवार यांचे उपोषण…
DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा
साक्री: साक्री शहरात 30 नोव्हेंबर 2023 पासून तहसील कार्यालय समोर सामाजिक कार्यकर्ते गुलाब पवार यांचे महाराष्ट्र राज्यातील आदिवासी विकास विभागात कल्याणकारी योजनांमध्ये सहा हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे , याचिका क्र. 153/2012 मा. उच्च न्यायालय मुंबई आदेश मा.न्यायमूर्ती यांची गायकवाड चौकशी समिती अहवाला प्रमाणे दोषी यांच्यावर कारवाई करावी व तसेच दोषींना सहकार्य करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करावा या विविध मागण्यासंदर्भात आमरण उपोषण सुरू आहे.
या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी साक्री तालुक्यातील विविध पक्ष, संघटना व त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते भेट देत आपला पाठिंबा दर्शवीत आहे.
साक्री तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पाचव्या दिवशी सोमवारी रोजी साक्री येथील पंचायत समिती येथून विविध आदिवासी संघटनेच्या वतीने पायी मोर्चा काढीत आमरण उपोषणाला पाठिंबा दर्शविला या वेळी आदिवासीं बांधवांच्या वतीने आदिवासी विभागात कल्याणकारी योजनांमध्ये भ्रष्टाचार केलेल्या मंत्री ची हकालपट्टी करीत व त्यांना सहकार्य करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करावा यासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा धडकवत पाठिंबा दर्शविला आहे.