DPT NEWS NETWORK 🗞️✍️
धुळे:- राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या वतीने रणजीत राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना भेटून जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्वरीत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कण्यात आली.
धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी व अमोसमी मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. संपूर्ण पिकांचे नुकसान होऊन शेतकरी हतबल झालेले आहेत. परंतु अद्यापही जिल्ह्यामध्ये पंचनामे झालेले नाही. तरी धुळे जिल्ह्यातील सर्वत्र शेतकऱ्यांचे त्वरित पंचनामे करण्यात यावे व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मागणी करण्यात येत आहे.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे रणजीत राजे भोसले, सुभाष पाटील, राजू डोमले, डी टी पाटील, वसंत तावडे, डी जे मराठे, भीका नेरकर, अशोक धुळकर, डोमनिक मलबारी, मनोज कोळेकर, वैभव पाटील, प्रणव भोसले, शकीला बक्ष, अमित शेख, जयंत चान्सरकर, रईस काझी, यशवंत पाटील, छाया सोमवंशी, स्वामीनि पारखे, चेतना मोरे, जयश्री घेटे, भटू पाटील, नंदू येलमामे, भूषण गवळे, युसूफ शेख, अशोक गवळे, राजू मशाल, भाग्येश मोरे, मशुद अन्सारी, राहुल महाजन, जावेद बेघ, नुरूद्दीन शहा, आकाश बैसाणे, सलमान खान, समदं शेख, रेखा घुले,कृष्णा ठाकरे, राजू सोनवणे,शामराव मोरे, जीवन चव्हाण, दीपक जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.