DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी: सुनिल मैदिले
उमरेड :- दिनांक 02/01/2024 रोजी पंडित दीनदयाल नाट्य सभागृह उमरेड येथे नगरपरिषद उमरेड तर्फे आयोजित आमदार राजूभाऊ पारवे यांच्या अध्यक्षते खाली उमरेड शहराची आढावा बैठक पार पडली.
या मध्ये मागील वर्षी झालेल्या आढावा बैठकीचे वाचन करण्यात आले. तसेच पाणी पुरवठा, स्वच्छता, सफाई, रस्ते, नाले, mseb, कृषी, सिटी सर्वे, पट्टे वाटप, घरकुल, अवैध ले-आऊट, अश्या अनेक प्रश्न नागरिकांनी या वेळी उपस्थित केले. आलेल्या सर्व प्रश्नावर तात्काळ कारवाही करून निकाली काढावे अशा आदेश या वेळी आमदार मोहद्यानी अधिकाऱ्यांना दिले. तसेच नवीन कामाचे निघालेले ऑनलाईन टेंडर काढण्यात यावे. मागील वर्षी कुत्र्यांच्या नसबंदी वर झालेल्या अतिरिक्त खर्चाची तपासणी करून योग्य कारवाही करण्याचे आदेश दिले.
या वेळी dysp राजा पवार, तहसीलदार संदीप पुंडेकर, मुख्याधिकारी अर्चना मेंढे, माजी नगराध्यक्ष गंगाधर रेवतकर, माजी स.गा. योजना अध्यक्ष जितेंद्र गिरडकर, माजी नगरसेवक सुरेश पौनीकर, विशाल देशमुख, सुरज इटणकर, महेश भुयारकर, सुरेश चिचमलकर, सतीश चौधरी, सोनू गणवीर, ठाणेदार प्रमोद घोंगे, उपमुख्याधिकारी राम कुल्लेवार, पत्रकार, कृषी अधिकारी, MSEB, माजी नगरसेवक, तसेच नागरिक मोठा संख्येने उपस्थित होते.