DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- सुनिल मैदीले
भिवापूर :- तालुक्यातील सेलोटी येथे गुरुवारी आयोजित शेतकरी मेळावा उत्साहात पार पडला. यात संत्रा, ऊस, मिरची व भरडधान्य आदी बाबत तज्ञ व्यक्तींनी मार्गदर्शन केले.
भाजपच्या किसान आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंदराव राऊत यांच्या शेतात यामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात संत्रा पिकाबाबत एनआरसीसी डॉ. मेश्राम, उसाबाबत राजेश भागल, मिरची विषयी धनुकाचे इंगळे, भरड धान्याविषयी पिकेव्हीचे खडसे व तालुका कृषी अधिकारी सोनाली गजब यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. मेळाव्यात नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आदींसह प्रतिथयश प्राप् प्रमोद घरडे, दिलीप सोनट्टके, हस्मतभाई खान , वसंतराव डांगरे, अरुण मेश्राम, श्रीमती विमलताई गिरडकर, नारायणराव खंडारे, रोहित कारू, सुरेश दळणे यांचा सत्कार करण्यात आला.
मेळाव्याला माजी आमदार सुधीर पारवे, आनंदराव राऊत, डॉ समय बनसोड, अनिल मेंढे, जयकुमार वर्मा, अरविंद गजभिये, विजयालक्ष्मी भदोरिया, रूपचंद कडू, सौ गोतमारे, मायाताई पाटिल, चरणजितसिंग आरोरा, महेश दिवसे, सुभाष राऊत, सुभाष कावटे, वामन श्रीरामे, सुधाकर बोरकुटे, उपविभागीय कृषी अधिकारी तसरे, कृषी उत्पन्न बाजार समिती व खरेदी विक्रीचे संचालक, मोनु दांदडे, नंदू माणकर, किरणताई साखरकर, भगवान राऊत आदी मान्यवरांसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येनी उपस्थित होते.